'ब्लू स्पेस'मध्ये राहणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:52 IST2019-10-05T10:42:08+5:302019-10-05T10:52:02+5:30
तुम्ही शहरातील गर्दी आणि गोंधळाने हैराण असाल, पण शहरी सुविधांमुळे तिथे राहत असाल तर भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी हे फार गंभीर ठरू शकतं.

'ब्लू स्पेस'मध्ये राहणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च?
(Image Credit : visitpensacola.com)
तुम्ही शहरातील गर्दी आणि गोंधळाने हैराण असाल, पण शहरी सुविधांमुळे तिथे राहत असाल तर भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी हे फार गंभीर ठरू शकतं. जर तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी असेल तर तुम्ही शहरापासून दूर जलीय क्षेत्रात म्हणजेच ब्लू स्पेसजवळ घर घ्यायला पाहिजे. लंडनमध्ये झालेल्या एका सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे की, जे लोक ब्लू स्पेसच्या आजूबाजूला राहतात, त्यांचं मानसिक आरोग्य दूर राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत २६ टक्के अधिक चांगलं राहतं.
या रिसर्चवर लक्ष देणं गरजेचं
येणाऱ्या काळात जगभरात मानसिक विकार, तणाव आणि डिप्रेशनने १६ ट्रिलियन डॉलरचं नुकसान होण्याचा अंदाज लावला जात आहे. २६ हजार लोकांवर यूनायटेड किंगडममध्ये करण्यात आलेल्या एका शोधातून समोर आले की, जे लोक समुद्र किनाऱ्यापासून अर्धा मैल दूर राहतात, त्यांचं मानसिक आरोग्य त्या लोकांच्या तुलनेत अधिक चांगलं असतं जे समुद्र किनाऱ्यापासून ३० मैल किंवा त्यापेक्षा जास्त दूर राहतात.
उत्पन्नासोबत मानसिक आरोग्यही तपासलं
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरच्या संशोधकांनी इंग्लंडच्या आरोग्य सर्व्हेक्षणातून मिळवलेल्या आकडेवारीचं विश्लेषण केलं. ज्यात त्यांचं मानसिक आरोग्य, फिटनेस, उत्पन्नासोबतच ते समुद्राच्या किती जवळ राहतात हेही बघितलं. सोबतच त्यांचं वय, लिंग, धुम्रपान आणि बीएमआय संबंधी माहितीचही विश्लेषण केलं.
कमी उत्पन्नातही राहतात सुखी
विश्लेषणातून समोर आले आहे की, जे लोक समुद्रापासून १ किलोमीटर दूर राहतात, त्यांच्यात मानसिक विकार होण्याची लक्षणे जे लोक समुद्र किनाऱ्यापासून ५० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक दूर राहतात त्यांच्या तुलनेत २२ टक्के कमी असते. 'ब्लू स्पेस' मध्ये राहण्याचे फायदे तपासतना अभ्यासकांना आढळलं की, कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येत हा फरक अधिक बघायला मिळाला. इथे कमी उत्पन्न असलेल्या लोकांचं देखील मानसिक आरोग्य ४० टक्के चांगलं होतं.
अर्थव्यवस्थेसाठी संकट मानसिक आरोग्य
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, इंग्लंडमध्ये सहा वैयस्कांपैकी एक मानसिक आजाराने पीडित आहेत. जसे की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थनुसार, पाच ही आकडेवारी पाच अमेरिकन लोकांपैकी एक आहे. गेल्यावर्षी जारी करण्यात आलेल्या ग्लोबल मेंटल हेल्थ अॅन्ड सस्टेनेबल डेव्हलपर्स रिपोर्टवर एक लान्सेट कमीशनने इशारा दिला होता की, मानसिक विकार प्रत्येक देशात वाढत आहेत.
ब्लू स्पेसची गरज समजा
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरमधील अभ्यासक डॉ. मॅथ्यू व्हाइट यांनी लिहिले की, 'अशाप्रकारच्या शोधातून सरकारला किनाऱ्यांवरील स्थानांचा उपयोग करणे, प्रोत्साहित करणे आणि तिथे राहण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याच्या दिशेत मदत मिळू शकेल'.