ग्रीन टीचं वजन कमी करण्यासाठी अलिकडे फार जास्त प्रमाणात सेवन केलं जातं. ग्रीन टीमुळे वजन कमी झाल्याचं लोकांमध्ये बघायला सुद्धा मिळतं. नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील जमा झालेलं फॅट कमी होऊ लागतं. त्यामुळे चहाला पर्याय म्हणून ग्रीन टी चं अधिक सेवन करतात. पण जसे ग्रीन टी चे फायदे आहेत, तसेच अनेक दुष्परिणामही आहेत.  चला जाणून घेऊ याने काय होतात नुकसान...

जास्त नका घेऊ ग्रीन टी

एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात २ ते ३ कप ग्रीन टी प्यायल्याने नुकसान होत नाही. पण जर एखादी व्यक्ती यापेक्षा ग्रीन टीचं सेवन करत असेल तर याचे साइड-इफेक्ट्स व्यक्तीमधे दिसू लागतात.

लिव्हरचं होतं नुकसान

काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, जास्त ग्रीन टी प्यायल्याने लिव्हरचं नुकसान होतं. ग्रीन टीचं अधिक सेवन केल्याने लिव्हरच्या कार्यप्रणालीत गडबड होऊ शकते. लिव्हरला काम करण्यात समस्या येते. याने लिव्हरशी संबंधित समस्या आणि इन्फेक्शन होऊ शकतं.

एनिमियाचं कारण ठरू शकते ग्रीन टी

जेवणातून मिळणारं आयर्न शरीरात हीमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं. आयर्नच्या कमतरतेमुळे एनिमिया म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता होऊ शकते. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, ग्रीन टी च्या अधिक सेवनाने रक्ताची कमतरता येते. 

हे सगळ्यांनाच माहीत आहे की, कोणत्याही गोष्टीची अति केली तर त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. तसंच ग्रीन टीचं आहे. याचं योग्य प्रमाणात सेवन कराल तर तुम्हाला फायदा होईल, पण जास्त सेवन कराल तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Liver infections and iron deficiency can be a result of consuming too much green tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.