दारू न पिताही अनेकांचं लिव्हर होतंय डॅमेज, पाहा रोजच्या कोणत्या सवयी पडताहेत महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:51 IST2026-04-12T10:44:49+5:302026-04-12T10:51:02+5:30

Can Liver Cirrhosis Happen Without Alcohol: लिव्हर सिरोसिस हा लिव्हरसंबंधी आजार आहे. हा अशा लोकांमध्ये अधिक बघायला मिळतोय जे फार कमी किंवा अजिबातच दारू पित नाहीत. याची कारणे वेगवेगळी असतात. 

Liver cirrhosis rising without alcohol doctors warn, know its symptoms and causes | दारू न पिताही अनेकांचं लिव्हर होतंय डॅमेज, पाहा रोजच्या कोणत्या सवयी पडताहेत महागात

दारू न पिताही अनेकांचं लिव्हर होतंय डॅमेज, पाहा रोजच्या कोणत्या सवयी पडताहेत महागात

Can Liver Cirrhosis Happen Without Alcohol: समजा जर कुणाला लिव्हरसंबंधी काही आजार झाला तर जास्तीत जास्त लोकांच्या मनात आधी हेच येतं की, ती व्यक्ती दारू पित असेल. दारूमुळेच त्याच्या लिव्हरमध्ये बिघाड झाला असेल. जास्तीत जास्त लोक लिव्हरचा संबंध दारूशी जोडतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, दारू न पिताही लिव्हरसंबंधी आजार होऊ शकतो. अलिकडे लिव्हरसंबंधी समस्या अनेकांमध्ये बघायला मिळतात. लिव्हर सिरोसिस हा लिव्हरसंबंधी आजार आहे. हा अशा लोकांमध्ये अधिक बघायला मिळतोय ते फार कमी किंवा अजिबातच दारू पित नाहीत. याची कारणे वेगवेगळी असतात. 

सायलेंट किलर लिव्हर सिरोसिस

लिव्हर सिरोसिसला सायलेंट किलर आजार म्हटलं जातं. कारण हा आजार कोणत्याही लक्षणांशिवाय हळूहळू शरीराचं नुकसान करतो. जोपर्यंत याची लक्षणं स्पष्टपणे दिसू लागतात, तोपर्यंत लिव्हर बरंच डॅमेज झालेलं असतं. TOI ला डॉक्टरांनी सांगितलं की, आधी सिरोसिला केवळ दारूशी जोडून बघितलं जात होतं. पण आता लठ्ठपणा, चुकीचा आहार, डायबिटीस आणि फॅटी लिव्हरसारख्या लाइफस्टाईल आजारांसोबत हा आजार जुळला आहे. 

हा आजार कसा होतो?

लिव्हर शरीरातील एक खूप महत्वाचा अवयव आहे. जो अन्न पचन, विषारी तत्व फिल्टर करणे आणि मेटाबॉलिज्म संतुलित ठेवण्याचं काम करतो. पण जेव्हा यावर अधिक दबाव पडतो म्हणजे त्यावर फॅट जमा होतं, इन्फेक्शन होतं तेव्हा ते हळूहळू काम करू लागतं. पुढे जाऊन यामुळे सिरोसिसची समस्या होते. सुरूवातीची लक्षणं फार हलकी असतात. ज्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. लोक याला स्ट्रेस किंवा कमी झोप म्हणून सोडून देतात. पण आजार जसा वाढत जातो, लक्षणं गंभीर होत जातात. पोटात सूज, त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे, पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होणं आणि कमजोरी जाणवणं या गोष्टी दिसू लागतात.

डॉक्टर काय सांगतात?

डॉक्टर सांगतात की, लिव्हर सिरोसिस हा केवळ एका अवयवाचा आजार नाहीये, तर याने पूर्ण शरीर प्रभावित होतं. डायजेशन, इम्युनिटी आणि ब्लड सर्कुलेशनवरही याचा प्रभाव पडतो. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर वेळीच याची ओळख पटली तर स्थिती सांभाळली जाऊ शकते. यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट, अल्ट्रासाउंड आणि फायब्रोसिस टेस्ट केल्या जातात. सुरूवातीला लाइफस्टाईलमध्ये काही बदल केल्यास बराच फरक दिसून येऊ शकतो.

Web Title : बिना शराब के भी लिवर हो रहा है खराब: ये आदतें पड़ रही हैं भारी

Web Summary : शराब के बिना भी लिवर सिरोसिस हो सकता है, जो मोटापे और मधुमेह जैसी जीवनशैली से जुड़ी बीमारियों के कारण होता है। पाचन और प्रतिरक्षा को प्रभावित करने वाले इस साइलेंट किलर का समय पर पता लगाना ज़रूरी है।

Web Title : Liver Damage Without Alcohol: Daily Habits Costing You Dearly

Web Summary : Liver cirrhosis, often linked to alcohol, now affects non-drinkers due to lifestyle factors like obesity and diabetes. Early detection through tests and lifestyle changes are crucial to manage this silent killer that impacts digestion and immunity.