शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

हाडे ठिसुळं होणं वाटतं तितक साधं नाही, असु शकतात गंभीर आजार, 'ही' आहेत ५ कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 1:12 PM

आजकाल वयाच्या तिशीतच हाडे कमजोर होण्याची समस्या जाणवते. हे कशामुळे होत? तुमच्या जीवनशैलीतील या पाच गोष्टी यासाठी जबाबदार असतात...

हाडे बळकट करण्यासाठी शरीर कॅल्शियम व फॉस्फेटचा वापर करते. आहारात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास हाडे ठिसूळ बनतात. वयाच्या ४० व्या वर्षानंतर जेवणात कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे कारण याच काळामध्ये हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र आजकाल वयाच्या तिशीतच हाडे कमजोर होण्याची समस्या जाणवते. हे कशामुळे होत? तुमच्या जीवनशैलीतील या पाच गोष्टी यासाठी जबाबदार असतात...

धुम्रपान आहे घातकधूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येही हाडे पोकळ होण्याची क्रिया अधिक झपाट्याने होत असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये इस्ट्रोजेन तयार होण्यात अडथळा निर्माण होत असतो. तसेच धुप्रमान केल्यामुळे कॉर्टिसोलचे शरीरातील प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्ही सतत तणावाखाली राहता.

मद्यपानाने हाडे होतात ठिसुळरोज मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये हाडे झिजण्याची क्रिया झपाट्याने होत राहते. अधिक प्रमाणात मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीमध्ये सकस आणि संतुलित आहाराचा नेहमी अभावच दिसतो. अति मद्यपान केल्याने देखील कॉर्टिसोलचे शरीरातील प्रमाण वाढते. ज्यामुळे बोन स्टॉक लॉस व्हायला सुरुवात होते. तसेच शरीरात टेस्टेरॉन आणि अॅस्ट्रोजनचे उत्पादन होणेही कमी होते जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

व्यायामाचा अभाव प्रमुख कारणव्यायाम किंवा हालचालींचा अभाव असणे हे हाडे ठिसुळ होण्याचे प्रमुख कारण आहे. शारीरिक विश्रांतीच्या काळात हाड मजबुत होण्याची क्रिया मंदावते. त्यांच्या शरीरात बोन लॉस अधिक होतो. मसल्सचे कॉन्ट्रॅक्ट होणे तुमच्या शरीरासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे व्यायाम करा. दिवसभर अ‍ॅक्टीव्ह न राहिल्याने बोन डेन्सिटी कमी होण्याचा धोका असतो.

खारट गोष्टींचे अतिसेवनजर तुम्ही खारट गोष्टी जास्त खात असाल तर तुमची बोन डेन्सिटी कमी होण्याची शक्यता असते. आहारात मीठाचे जास्त प्रमाण हाडांना अत्यंत मारक ठरतो हे सर्वानी लक्षात ठेवले पाहिजे. दरडोई मीठ १ चमचापर्यंत मर्यादित ठेवायला सांगतात; पण लोक दुप्पट मीठ वापरतात. १ चमचा मीठ वापरण्याने चाळीस मिलिग्रॅम कॅल्शियम बाहेर फेकले जाते.

सुर्यप्रकाशाचा अभावसतत घरातच राहिल्यामुळे हाडे ठिसुळ होतात. हाडांसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नसेल तर त्यामुळे तुमची हाडं ठिसुळ होतात. तुम्ही दिवसातून जवळपास १५ मिनिटे तरी सुर्यप्रकाशात गेले पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स