रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होतं? वाचाल तर रोज कराल उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 15:34 IST2024-08-19T15:33:48+5:302024-08-19T15:34:24+5:30

Lemon In Bath Water : लिंबाच्या रसाने आपल्या शरीरावरील इन्फेक्शन, धूळ, माती डाग दूर होतात. तसेच याने तुम्हाला त्वचेसंबंधी अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....

Lemon water bath health benefits | रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होतं? वाचाल तर रोज कराल उपाय...

रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होतं? वाचाल तर रोज कराल उपाय...

Lemon In Bath Water : लिंबाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. लोक लिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही लोक रोज लिंबू पाणी पितात, तर काही लोक लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतात. पण आज लिंबाचा एक वेगळाच उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोज आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसाने आपल्या शरीरावरील इन्फेक्शन, धूळ, माती डाग दूर होतात. तसेच याने तुम्हाला त्वचेसंबंधी अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....

तेलकट त्वचेपासून सुटका

काही लोकांची त्वचा ही तेलकट असते. चेहऱ्या सतत तेल येतं. ही समस्या दूर करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. जर आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस टाकला तर ही समस्या दूर होईल. तसेच त्वचेवरील डाग, पिंपल्सही दूर होण्यास मदत मिळेल. 

त्वचेसाठी फायदेशीर

आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकणे हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक हा उपाय वापरतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता. 

सुरकुत्यासाठी होतील दूर

आपलं शरीर एका इंजिनसारखं असतं. जसे आपण एखादी गाडी खरेदी करतो, तेव्हा ती सुरूवातीला चांगला मायलेज देते आणि वेळेनुसार तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती खराब होते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचं आहे. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पौष्टिक आहार देत नाही तेव्हा त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता.

शरीराची दुर्गंधी होते दूर

वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.

Web Title: Lemon water bath health benefits