लिंबाच्या सालीने दूर होईल पोटावर वाढलेली चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:39 IST2024-12-25T14:39:03+5:302024-12-25T14:39:40+5:30
Lemon peel for belly fat: कचरा म्हणून फेकली जाणारी लिंबाची साल तुमचं वजन कमी करण्यास मदत करते. सोबतच पचन तंत्रही मजबूत करते.

लिंबाच्या सालीने दूर होईल पोटावर वाढलेली चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!
Lemon peel for belly fat: पोटावर वाढलेली चरबी कमी करणं काही वाटतं तेवढं सोपं काम नाही. चरबी कमी करण्यासाठी लोक डायटिंग, एक्सरसाईज आणि अनेक प्रोडक्ट्सची वापर करतात. मात्र, यासोबतच तुम्हाला चरबी कमी करण्यासाठी लिंबाची सालही मदत करू शकते. कचरा म्हणून फेकली जाणारी लिंबाची साल तुमचं वजन कमी करण्यास मदत करते. सोबतच पचन तंत्रही मजबूत करते.
लिंबाच्या सालीमध्ये पेक्टिन आणि पॉलीफेनोल्स भरपूर प्रमाणात असतं. जे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. यात असलेले डिटॉक्सिफाइंग गुण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. सालीमध्ये व्हिटॅमिन सी अधिक असल्यानं शरीरात जमा फॅट कमी करण्यास मदत करतं.
कसा कराल लिंबाच्या सालीचा वापर?
लिंबाच्या सालीचा चहा
दोन लिंबाची साल घ्या आणि उकडत्या पाण्यात टाका. यात थोडं मध टाका. हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्या. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि पोटातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
लिंबाच्या सालीचं पावडर
लिंबाची साल सुकवून त्याचं बारीक पावडर तयार करा. हे पावडर कोमट पाण्यात टाकून सकाळी पिऊ शकता.
लिंबाच्या सालीचं डिटॉक्स वॉटर
एक बॉटल पाण्यात लिंबाची साल टाका आणि रात्रभर हे पाणी तसंच ठेवा. सकाळी हे पाणी प्यावं. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते आणि वजनही कमी होतं.
लिंबाच्या सालीचे फायदे
लिंबाची साल पोटावरील चरबी कमी करण्यासोबतच इम्यूनिटीही मजबूत करते. ज्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांचा धोका कमी होतो. तसेच शरीराची आतून सफाई केली जाते. लिंबाची साल त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
काय काळजी घ्याल?
लिंबाची साल वापरण्याआधी ती चांगली धुवून घ्या. जर तुम्हाला एखादी एलर्जी असेल किंवा एखादा आजार असेल तर याचा वापर करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.