पोटात उजवीकडे दुखत असेल तर असू शकतो 'या' गंभीर समस्येचा संकेत, सर्जरीशिवाय नाही पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 11:06 AM2020-02-18T11:06:29+5:302020-02-18T11:06:57+5:30

अपेंडिक्स हा एक अवयव आहे जो छोट्या आणि मोठ्या आतड्यांच्या जॉइंटवर आढळतो. याला वेस्टिजिअल अवयवही म्हणतात.

Know the symptoms and cure from appendicitis | पोटात उजवीकडे दुखत असेल तर असू शकतो 'या' गंभीर समस्येचा संकेत, सर्जरीशिवाय नाही पर्याय!

पोटात उजवीकडे दुखत असेल तर असू शकतो 'या' गंभीर समस्येचा संकेत, सर्जरीशिवाय नाही पर्याय!

googlenewsNext

अपेंडिक्समध्ये सूज म्हणजे अपेंडिसायटीस ही एक सामान्य समस्या आहे. पण याकडे दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं. ‘अपेंडिक्स’ला मराठीत आंत्रपुच्छ म्हणतात. हा आपला एक अवयव आहे. तसं पाहायला गेला तर एक निरुपयोगी, पण जंतुसंसर्ग झाला तर त्रासदायक असा हा अवयव आहे.

काय आहे अपेंडिक्स?

अपेंडिक्स हा एक अवयव आहे जो छोट्या आणि मोठ्या आतड्यांच्या जॉइंटवर आढळतो. याला वेस्टिजिअल अवयवही म्हणतात. कारण याचं शरीरात काही महत्व नसतं. हा अवयव नसला तरी आपण सामान्य जीवन जगू शकतो. हा अवयव गांडूळाच्या आकाराचा असतो. साधारणे याची लांबी ७ ते १० सेंटीमीटरपर्यंत असते.

का होते ही समस्या?

अपेंडिक्सवर सूज येण्याची दोन कारणे असू शकतात. एक इन्फेक्शन आणि दुसरं म्हणजे अपेंडिक्समध्ये काही फसल्यानेही होते. तसेच डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांची कमतरता हेही एक मुख्य कारण असू शकतं. आतड्यांच्या कॅन्सरमुळेही अपेंडिक्सची समस्या होऊ शकते. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते, पण १० ते ३० या वयात ही समस्या होण्याची शक्यता अधिक असते.

(Image Credit : mdpremier.com)

आतडय़ांतील अन्न काही कारणामुळे आपला सरळ रस्ता सोडून या अपेंडिक्सच्या फाटय़ात शिरतं. पुढे रस्ता नसल्याने अपेंडिक्सच्या आतच पडून राहतं व त्यात कुजण्याची प्रक्रिया होते. यामुळे जंतुसंसर्ग होऊन अपेंडिक्सला सूज येते व दुखणं सुरू होतं.

१) बद्धकोष्ठता (Constipation) – रोज शौचाला साफ न होणं. यामुळे मोठय़ा आतडय़ातील अन्न पुढं सरकायला थोडा जास्त वेळ घेतं. आतडय़ामध्ये खडे होणं.

२) वरचेवर पावभाजी, पिझ्झा, तळलेले पदार्थ, नुसतंच नॉनव्हेज खाण्यामुळे अन्नातील तंतुमय पदार्थ फार कमी प्रमाणात पोटात जातात– त्यामुळे आतडय़ातून अन्न पुढे सरकण्याची क्रिया हळू होते. हे अन्न सरळ रस्ता सोडून अपेंडिक्समध्ये शिरतं व अपेंडिसायटिस होऊ शकतो.

३) अंथरुणाला खिळलेल्या (Bed ridden) व्यक्ती – यांची शारीरिक हालचाल कमी असल्याने आतडय़ांची हालचालपण मंदावते व अन्न अपेंडिक्समध्ये शिरू शकतं.

४) जंत (Worms) किंवा अपेंडिक्सच्या गाठीने अपेंडिसायटिस होऊ शकतो.

काय दिसतात सूज आल्याची लक्षणे?

याचा सर्वात मोठा संकेत आहे पोटात उजव्या खालच्या बाजूला वेदना होतात. सामान्यपणे या वेदना नाभिजवळही सुरू होतात आणि नंतर उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या वेदना सामान्य असण्यापासून नंतर असह्य होऊ शकतात. खोकलल्यावर आणि जोरात हसल्यावरही वेदना होतात. 

(Image Credit ; verywellhealth.com)

पोटात वेदना होण्यासोबत आणखीही काही लक्षणे असू शकतात. त्यात पोट फुहणे, उलटी होणे, अपचन, मळमळ होणे, भूक न लागणे, लूज मोशन, लघवीत जळजळ होणे, कधी कधी लघवीतून रक्त येणे आणि चालण्यात समस्या येणेही यांचा समावेश आहे.

काय कराल?

(Image Credit : vitals.com)

ही लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर तुम्हाला काही ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट आणि सोनोग्राफी करण्यास सांगतील. गरज असेल तर सीटी स्कॅन करण्यासही सांगितलं जाऊ शकतं. जेव्हा अ‍पेडिंक्सचं निदान होतं तेव्हा सर्जरी करणं गरजेचं असतं. सर्जरी हा त्यावरील ठोस उपाय आहे. सर्जरी करून अपेंडिक्स काढलं जातं. सर्जरी केली नाही तर अपेंडिक्समध्ये पुन्हा पुन्हा सूज येऊ शकते आणि अपेंडिक्स फुटण्याचाही धोका वाढतो. 


Web Title: Know the symptoms and cure from appendicitis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.