या पदार्थांमुळे भरपूर मिळेल कॅल्शियम, हाडं आणि हृद्यविकारांच्या आजारांपासून रहाल दूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 10:10 AM2019-12-13T10:10:34+5:302019-12-13T10:21:57+5:30

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा आरोग्यावर नकारात्मक परीणाम होतो. बदलत्या जीवनशैलीत शरीराकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही.

Know the super foods which gives calcium and prevent from bones and heart disease | या पदार्थांमुळे भरपूर मिळेल कॅल्शियम, हाडं आणि हृद्यविकारांच्या आजारांपासून रहाल दूर 

या पदार्थांमुळे भरपूर मिळेल कॅल्शियम, हाडं आणि हृद्यविकारांच्या आजारांपासून रहाल दूर 

googlenewsNext

खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींचा आरोग्यावर नकारात्मक परीणाम होतो. बदलत्या जीवनशैलीत शरीराकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवतात. त्यामुळे कमी वयात सांधेदुखी, थकवा येणे, हाडं कमकुवत होणे अशा समस्या जाणवतात. या आजारांपासून बचाव करायचा असल्यास शरीरात कॅल्शीयम, व्हिटामीन्स असणं गरजेच असतं.  काही सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास शरीरासाठी लाभदायक ठरेल.

अंजीर

अंजीर आरोग्‍यासाठी  लाभदायक  आहे. अंजीरात कॅल्‍शियम बरोबर फायबर, पोटेशियमची मात्रा आढळते. यामुळे हाडं मजबूत होतात. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहासाठी  गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात. शरीर संतुलित राहते. 

पनीर

पनीरमध्ये कॅल्शियमबरोबरच प्रोटीनसुध्दा असते. आहारात पनीरचा समावेश केल्यास कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहते. त्यामुळे हाड बळकट होतात. त्याशिवाय केस गळणंसुध्दा पनीरचं सेवन केल्याने थांबते. 


बदाम

बदाम हा कॅल्‍शियमचा चांगला स्‍त्रोत आहे. बदामात सर्व घटकापेक्षा  जास्‍त कॅल्‍शियम आढळते. कॅल्‍शियम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्‍त असते. बादामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.  


दुधयुक्त पदार्थ

दुधयुक्‍त पदार्थात कॅल्‍शियमचे प्रमाण आढळते. दूध, पनीर, दही यांचा आहारात समावेश करायला हवा. यामुळे शरिरात कॅल्‍शियमची वाढ होण्‍यास मदत होईल. 

संत्री 

प्रत्‍येकाने आहारात फळांचा समावेश करायला हवा. यामध्‍ये प्रामुख्‍याने संत्री या फळाचा वापर केला पाहिजे. संत्री या फळामध्‍ये डी जीवनसत्‍व व कॅल्‍शियम हा घटक आढळतो. सध्या हिवाळा सुरू झाल्याने संत्री मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे संत्र्याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं

Web Title: Know the super foods which gives calcium and prevent from bones and heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.