(image credit-www. express.co.uk)

महिलांना स्वतःकडे पूरेसं लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे  त्यांना वेगवेगळ्या आजारांना बळी पडाव लागतं. दैनंदीन आयुष्य  जगत असताना अनेक तक्रारी उद्भवत असतात. कामाचा ताण आणि धावपळ  असल्यामुळे महिला नेहमीच त्यांना सतत होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष  करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा आजाराबद्दल सांगणार आहोत जो आजार महिलांना मोठ्या प्रमाणात उद्भवत असतो.  लहानमोेठ्या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार वाढत जातो.  चला जाणून घेऊया या आजाराची कारणं आणि लक्षणं.

महिलांना  आपल्या अवयवांशी संबंधीत आजार होतात पण त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. गर्भाशयाचा कॅन्सर हा आजार सध्याच्या काळात सामान्य झाला आहे.  याचं मुख्य कारणं तुमचं राहणीमानं आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे असू शकतं. गर्भधारणेच्या वेळी सुद्धा महिलांच्या गर्भाशयाला सुज येत असते. महिलांना ५० ते ५५ वर्ष या वयोगटात  सुज येते . त्यावेळी मेनोपॉज हा जवळ आलेला असतो.  पिरियड्स बंद होण्याची समस्या जेव्हा उद्भवते तेव्हा पीसीओएस (PCOS) ची समस्या जाणवते. त्यामुळे गर्भाशयाला सुज येऊ शकते. 

Image result for uterus cancerगर्भाशयाचा कॅन्सर

गर्भाशयाच्या आतल्या भागातुन तो  एक थर जमा झालेला असतो. त्याला  एंडोमेट्रियम असं म्हणतात. या आजारात एंडोमेट्रियमचा थर  वेगाने वाढत जातो. एंडोमेट्रियल कॅन्सर हा जीवघेणा आहे. कारण त्यामुळे महिलांची आई होण्याची क्षमता कमी होत असते. एंडोमेट्रियल कॅन्सरमुळे जन्माला येत असलेल्या बाळाला सुद्धा कॅन्सर होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला मासिक पाळीच्या व्यतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल. तसंच योनीतुन  कोणत्याही प्रकारचा स्त्राव होत असेल तर तुम्ही या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. 

Image result for uterus cancer

लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांचा परिणाम हे आजार होण्यामागे कारणीभूत आहे.  अन्हेल्दी पदार्थ खाणे, शारीरिक हालचाल न करणे, ताण-तणाव  यामुळे गर्भाशयाच्या भागात सुज येण्याची शक्यता असते.  ज्यामुळे मासिक पाळीच्या वेळी सुद्धा समस्या जाणवतात.  यामुळे गर्भाशयाचे वेगवेगळे आजार  होतात. त्याला गर्भाशय फाइब्रॉइड असं म्हणतत. 


(Image credit- express.co.uk)

लक्षणं

गर्भाशयाच्या आकारात झालेल्या बदलामुळे सुज  येत असते.  

मासिकपाळी अनियमीत होणे,

पोटात जास्त दुखणे तसंच ओटी पोटात वेदना होणे.

जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे.

शरीर जड वाटणे.  

शरीराच्या विविध भागात सुज येणे,

अंग पिवळे पडणे.

कमरेच्या आसपासच्या भागात जास्त चरबी जमा होणे.
Image result for women uterus cancer
गर्भाशयाच्या  कॅन्सरपासून वाचण्यासाठी उपाय

तुम्हाला अंग सुजल्यासारखं वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.  काहीवेळा घरगुती उपायांचा वापर करून सुद्धा तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता.  तसंच दररोज जर तुम्ही व्यायाम केलात तर तुम्हाला आजारांपासून वाचता येईल.

आळशीच्या बीया

Image result for alshi chya biya

जर तुम्ही आळशीच्या बीयांचा वापर करून आरोग्य चांगलं ठेवू शकता.  त्यासाठी तुम्ही  दळलेल्या आळशीच्या बीया  दुधात उकळून रात्री झोपायच्या आधी पिऊन झोपा. ( हे पण वाचा-बटाट्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे वाचाल तर साल फेकण्याआधी नक्की विचार कराल!)

हळदीचे दुध

Image result for haldevala doodh

हळदीचं दूध रात्री  झोपण्याआधी प्यायल्याने तुम्हाला गर्भाशयाच्या आजारांपासून दूर राहता येईल.( हे पण वाचा-Lung Cancer Symptoms : दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला येत असेल तर हा असू शकतो Lung Cancer चा संकेत!)

लिंबाची पानं

Image result for neem leaves

तुम्ही तुमच्या गर्भाशयाचा व्यवस्थित  ठेवायचं असेेल तर  लिंबाच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी  लिंबाची पानं आणि सुंठ पाण्यात उकळून त्याचा काढा तयार करा. दिवसातून  एकदा  काढ्याचे सेवन करा. 

Web Title: Know the sings and reasons of uterus cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.