बटाट्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे वाचाल तर साल फेकण्याआधी नक्की विचार कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 06:12 PM2020-01-16T18:12:46+5:302020-01-16T18:24:44+5:30

जीवनशैलीत झालेले बदल आणि खाण्यापिण्याच्या सवयीत असलेली अनियमीतता यांमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक उद्भवते.  

Know the benefits of potato cover for health | बटाट्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे वाचाल तर साल फेकण्याआधी नक्की विचार कराल!

बटाट्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे वाचाल तर साल फेकण्याआधी नक्की विचार कराल!

googlenewsNext

जीवनशैलीत झालेले बदल आणि खाण्यापिण्याच्या सवयीत असलेली अनियमीतता यांमुळे वजन वाढण्याची, हृदयासंबंधी आजारांची समस्या सर्वाधिक उद्भवते.  आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा वापर  करून कशापध्दतीने आरोग्य कसं नीट ठेवता येईल हे  सांगणार आहोत.  बटाट्याच्या सालीचा वापर करून तुम्ही आपलं शरीर चांगलं ठेवू शकता.

Image result for PATATO COVER
सर्वसाधारणपणे आपण जेव्हा बटाटा घरी भाजीसाठी कापतो तेव्हा त्याचं साल फेकून देतो पण असं न करता तुम्ही जर साल फेकून देत असाल यापुढे असं न करणंच फायद्याचं ठरेल बटाट्याच्या सालीचा वापर करून तुम्ही  अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता.  जाणून घेऊया कसा करायचा बटाट्याच्या सालीचा वापर. ( हे पण वाचा-पायांच्या रोजच्या दुखण्याला जबाबदार आहे 'हा' आजार, वेळीच व्हा सावध)

Image result for PATATO COVER
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं 

बटाट्याच्या सालीत मोठ्या प्रमाणावर फायबरर्स असतात.  त्यामुळे कॉलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. लाल रक्तपेशींची कमतरता असणे यास एनिमिया म्हणतात. शरीरात आयर्नची मात्रा कमी असल्यास एनिमिया होतो. बटाटा सालीसकट खाल्ल्यास तुमच्या शरीरात आयर्नचं प्रमाण वाढतं. (हे वाचा-काळाची गरज! जीवनदान देणाऱ्या लिव्हर ट्रान्सप्लांटबाबतच्या 'या' गोष्टी सर्वांना माहीत असाव्यात!)

उर्जा मिळते

Image result for PATATO COVER

बटाट्यात  व्हिटॅमिन बी-३ असते.  हा घटक कार्बोहायड्रेटचं रूपांतर ऊर्जेत करतो ज्यामुळे तुमच्या शरीराला विविध कार्य करण्यास ऊर्जा मिळते. तसंच या घटकामुळे नव्या पेशींचीही निर्मिती होते आणि स्ट्रेसमुळे पेशींना होणाऱ्या हानीपासून बचाव होतो.

त्वचेसाठी  फायदेशीर

बटाट्याचा रस चेहऱ्यावर चोळल्यास चेहरा उजळतो.  डोळ्यांच्या खालची वर्तुळं निघून जाण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. बटाटाच्या साली केसांवर चोळून काही मिनिटांनी धुवावेत, असं नियमित केल्यास केस वाढीला चालना मिळते.

हृदयाच्या आजारांपासून सुटका 

पोटॅशियमचीचे प्रमाण जास्त असल्यामुळे हदृयाशी निगडीत आजारांपासून  सुटका मिळवता येऊ शकते.  यात ओमेगा-३ फॅट्स असतात त्यामुळे हृदया निरोगी राहण्यास मदत होते. तसंच बटाट्याची साल पायांच्या तळव्यांना घासल्यानंतर उष्णता कमी होण्यास मदत होते.

Web Title: Know the benefits of potato cover for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.