कपडे धुण्यासाठी वापरत असलेला डिर्टजन्ट ठरू शकतो घातक, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 09:59 AM2020-02-22T09:59:19+5:302020-02-22T10:10:02+5:30

डिर्टेजंटमध्ये सगळ्यात जास्त नोनीफ्लेनॉल(Nonylphenol) या रसानाचा वापर सर्वाधिक दिसून येतो.

Know the side effects of detergent , it can be dangerous | कपडे धुण्यासाठी वापरत असलेला डिर्टजन्ट ठरू शकतो घातक, वेळीच व्हा सावध!

कपडे धुण्यासाठी वापरत असलेला डिर्टजन्ट ठरू शकतो घातक, वेळीच व्हा सावध!

googlenewsNext

(image credit- travel fashin girl)

आपण घरातील कपडे धुत असताना स्वच्छ  धुतले जावेत यासाठी वेगवेगळ्या वॉशिंग पावडरचा आणि साबणाचा वापर करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का  डिर्टजन्टने कपडे धुणं  हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला  डिर्टजन्टच्या वापराबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. बाजारात विकल्या जात असलेल्या  डिर्टजन्टमध्ये सगळ्यात जास्त नोनीफ्लेनॉल(Nonylphenol) या रसानाचा वापर सर्वाधिक दिसून येतो. कारण त्यात  एम्फीफिलिक  गुणधर्म असतात. ज्यामुळे कपडे लवकर स्वच्छ होतात. 

(image credit-clean.pedia.com)

नोनिलफ्लेनॉल(Nonylphenol)  हे रसायन वन्यजीव आणि पाण्यात राहत असलेल्या जीवांसाठी खूप घातक असतं. त्यामुळे प्राणीच नाही तर माणसांच्या शरीरात सुद्धा बदल दिसून येत असतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे अशा समस्या दैनंदिन जीवनात उद्भवू शकतात. अमेरिका आणि चीन या देशात सुरूवातीपासूनच नोनिलफ्लेनॉलच्या वापराबाबत नियम तयार  करण्यात आले आहेत. पण भारतात असे नियम लागू केले  नसल्यामुळे आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या अनेक समस्यांशी सामना करावा लागतो. 


(image credit- science ABC)

नोनीफ्लेनॉलपासून प्रतिबंध

(image credit- alexnld.com)

एका अभ्यासानुसार नोनिलफ्लेनॉलचा वापर संपूर्णपणे बंद करण्यात यावा. असं केल्यास आरोग्यासंबंधी समस्या उद्भवणं कमी होईल.  बाजारात उपलब्ध असणारे अनेक  डिर्टजन्ट  ड्राई क्लोरीनपासून तयार झालेले असतात. ते पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर अधिक सक्रीय होत असतात.  जर तोंडाद्वारे शरीरात या घटकाचा प्रवेश झाला तर  गळ्यात आणि तोंडात  जळजळ होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-एकदा जर घ्याल पेरूच्या पानांचा ज्यूस तर डॉक्टरकडे जाणं विसराल, फायदे वाचून थक्क व्हाल!)

डिर्टजन्टच्या संपर्कात आल्यामुळे  त्वचेवर एलर्जी होते. त्यामुळे त्वचा खेचल्यासारखी वाटते. अनेक प्रकारच्या केमिक्लचा वापर यात करण्यात आला असल्यामुळे त्वचेवर खाज येण्याची शक्यता असते. त्यामुळे डिर्टजन्टचा वापर न करता साबणाचा वापर करावा. कारण साबणाच्या वापराने  त्वचेला होणारे नुकसान तुलनेने कमी असते. (हे पण वाचा-जिममध्ये एक्सरसाइज करताना कसे कपडे वापरावेत, तुम्हाला माहीत आहे का?)

Web Title: Know the side effects of detergent , it can be dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.