तज्ज्ञच सांगतायत, भात खाऊनही वाढणार नाही वजन मात्र त्यासाठी यापद्धतीने शिजवा भात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 18:07 IST2021-12-03T18:05:30+5:302021-12-03T18:07:47+5:30
तुम्ही भात खाऊनही आयुष्यभर सडपातळ कंबर मिळवू शकता. यासाठी तुम्हाला थोडे काम करावे लागेल. वजन कमी करण्याचा हा उपाय तुमच्या पोटाची चरबी नेहमी कमी ठेवेल आणि तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येने कधीही त्रास होणार नाही.

तज्ज्ञच सांगतायत, भात खाऊनही वाढणार नाही वजन मात्र त्यासाठी यापद्धतीने शिजवा भात...
तुम्हाला माहिती आहे का भात खाल्ल्यानेही वजन कमी करता येते. पोषणतज्ञ पूजा माखिजा यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. याद्वारे तुम्ही भात खाऊनही आयुष्यभर सडपातळ कंबर मिळवू शकता. यासाठी तुम्हाला थोडे काम करावे लागेल. वजन कमी करण्याचा हा उपाय तुमच्या पोटाची चरबी नेहमी कमी ठेवेल आणि तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येने कधीही त्रास होणार नाही.
वजन कमी करण्यासाठी लाल तांदूळ: वजन कमी करण्यासाठी पांढर्या तांदळात लाल तांदूळ मिसळा
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पूजा माखिजा यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, भात खाऊन वजन कमी करायचे असेल, तर भात बनवताना पांढऱ्या भातासोबत लाल भातही शिजवावा. याचा अर्थ असा की जर तुम्ही २ कप पांढरा तांदूळ घेत असाल तर त्यात अर्धा कप लाल तांदूळ मिसळा. यामुळे भाताची चव बदलणार नाही आणि पोटाची चरबीही कमी होईल. संतुलित आहारासाठी ही एक उत्तम टीप आहे.
लाल तांदळाचे फायदे
-लाल तांदळात प्रथिने आणि फायबर खूप जास्त असतात, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. तसेच त्यात फॅट अजिबात नसते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम अन्न आहे.
-लाल तांदूळ हे मधुमेहामध्ये देखील फायदेशीर अन्न आहे. कारण, यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
-अस्थमाच्या रुग्णांनाही लाल तांदळाचे फायदे मिळू शकतात. कारण, यामध्ये असलेले मॅग्नेशियम श्वासोच्छवासाची पद्धत सुधारते आणि शरीरात ऑक्सिजनचा वापर सुधारते.
-जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रास होत असेल तर लाल तांदळाचे सेवन करा. यामध्ये असलेले विद्राव्य आणि अघुलनशील फायबर पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेपासून आराम देते.