वजन कमी होत नाहीये? 'ही' फळं खाल्ल्यानंतर ७ दिवसात वजन होईल कमी...मग बघा कमाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 11:06 AM2019-12-15T11:06:22+5:302019-12-15T11:26:02+5:30

फिट राहण्यासाठी सुंदर आणि सुडौल बांधा हा सगळ्यांनाच हवा असतो.

Know to loss weight by using this 5 fruits | वजन कमी होत नाहीये? 'ही' फळं खाल्ल्यानंतर ७ दिवसात वजन होईल कमी...मग बघा कमाल 

वजन कमी होत नाहीये? 'ही' फळं खाल्ल्यानंतर ७ दिवसात वजन होईल कमी...मग बघा कमाल 

Next

(imagecredit-bioalaune)

फिट राहण्यासाठी सुंदर आणि सुडौल बांधा हा सगळ्यांनाच हवा असतो.  वातावरणात होणारा बदल,  झोपेची तसंच खाण्यापिण्याची वेळ निश्चीत नसणे या सगळ्या सवयींचा परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यातूनच लठ्ठपणा निर्माण होतो. कितीही प्रयत्न केले तरी वाढलेलं वजन आटोक्यात आणणं कठिण होऊन बसतं. तुम्ही सुध्दा जर वजन कमी  करण्याचे प्रयत्न करून थकला असाल तर तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. रोजच्या आहारात काही फळांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती फळं आहेत जी खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

(Image credit- istock.com)

सफरचंद  

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने पोटावरची चरबी कमी होते. सफरचंदात फायबर, बीटा कॅरेटीन यांसारखे शरीरास पोषक असलेले घटक आढळतात. सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकारांना दूर करण्यास फायदेशीर ठरतं. त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.  खाल्लेले अन्न अधिक पचनीय आणि मुलायम बनवतो. त्यामुळे जलद गतीने अन्नाचे पचन होते. हाडांनाही मजबूत बनवण्याचे काम सफरचंदाचे सेवन केल्यास होते. चरबीला वाढवण्यास प्रतिबंध करतो. सफरचंद पाचनतंत्रातील बिघाड दूर करतो.


संत्री-

 

सध्या हिवाळा सुरू झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात संत्री उपलब्ध  होतात. संत्री शरीरासाठी तसंच त्वचेसाठी सुध्दा लाभदायक ठरतात. नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो. डाएटिंग न करताही संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येणे शक्य आहे .कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व 'अ' आणि 'ब' जीवनसत्त्वे हे घटक संत्र्यामध्ये असल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरतात. 


कलिंगड 

वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. कलिंगडाचे सेवन केल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. कलिंगड खाल्ल्याने फक्त पोटच नाही तर डोकंही थंड राहण्यास मदत होते.


स्ट्रॉबेरी

स्ट्रोबेरी ह्या फळाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. स्ट्रोबेरी या फळात फायबर मोठया प्रमाणात असतात. म्हणुन स्ट्रोबेरी आपल्या आतडयांना स्वस्थ ठेवते, तसंच शरीरातील अतिरीक्त फॅट निघण्यास मदत होते. 


केळी

(Image credit- freepik.com)

जर तुम्ही व्यायाम करत असाल तर आहारात केळ्यांचा समावेश करा. कारण हेल्दी डाएटमध्ये केळ्यांचा समावेश होतो. पोटाच्या अनेक विकारांवर केळी फायदेशीर आहे. केळी नियमित खाल्ल्याने पाचनक्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यासही मदत होते.

Web Title: Know to loss weight by using this 5 fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.