खाल्ल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर सावधान,'या' गंभीर आजारांना पडू शकता बळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 10:57 AM2019-12-29T10:57:00+5:302019-12-29T11:23:22+5:30

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो.

Know the drinking water immediately after eating can affect to body | खाल्ल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर सावधान,'या' गंभीर आजारांना पडू शकता बळी...

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर सावधान,'या' गंभीर आजारांना पडू शकता बळी...

googlenewsNext

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो. असे फार कमी लोकं असतात त्यांना खाण्याच्या दरम्यान कधी पाणी प्यायचं आणि कधी पाणी नाही प्यायचं हे माहीत असतं. जेवणानंतर पाण्याचे सेवन करतं असताना ते कधी करायचं हे माहित नसल्यामुळे  नकळतपणे पोटाच्या विकारांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घ्या पाणी अयोग्य वेळी प्यायल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात.

(image credit- mordern ghana)

आयुर्वेदानुसार आपण जे काही खात असतो ते अन्न नाभीच्या विरूद्ध बाजूला जठराग्नीमध्ये पचत असतो. तसंच हा जठर अग्नी जेवल्यानंतर एक तास सक्रीय राहत असतो. त्यामुळे  भूक लागल्यानंतर लगेच जेवल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्यास जठराग्नी हा शांत होत असतो. त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो. म्हणून असं म्हणतात की जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नसतं. 

जेवणात समावेश असलेले व्हिटामीन्स आणि इतर पोषक तत्व शरीरात शोषून घेण्यासाठी  थोडावेळ देणं गरजेचं  असतं. तसंच जर खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने  आपल्या पचनक्रीयेवर त्याचा परीणाम होत असतो. त्यामुळे काही खाल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिणं टाळायला हवं. 

न्यूट्रिशनिस्टच्यामते  जेवण केल्यानंतर ते पचण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत  असतो. त्यानंतर खाल्लेलं अन्न मलाच्या स्वरूपात तयार होत असतं. या दरम्यान पाणी  जेवल्यानंतर लगेचच प्यायल्यास खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. तसंच खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे अपचन, गॅस, एसिडीटी  अशा पोटाच्या समस्या उद्भवतात. तापमान प्रभावित होऊन आजारी पडण्याची शक्यता असते. 

(image credit-east coast daily english)

जर तुम्ही खाल्ल्यानंतर लगेचचं पाण्याचं सेवन करत असाल तर अन्न मोठ्या प्रमाणात पोटात पडून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण वाढून मधूमेह होण्याची शक्यता असते. तसंच रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. जर तुम्ही गोड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पित असाल तर ही गोष्ट शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढण्याचा धोका उद्भवू शकतो.

Web Title: Know the drinking water immediately after eating can affect to body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.