युटीआय आणि यीस्ट इन्फेक्शनमध्ये 'हा' आहे फरक, लागण होण्याआधी जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 11:16 AM2020-05-06T11:16:48+5:302020-05-06T12:10:49+5:30

कॉमन हेल्थ फॅक्टर युटीआय आणि वजायनल इंफेक्शन कसं वेगवेगळं असतं. याबाबत सांगणार आहोत. 

know the difference between uti yeast and bladder infection know the symptoms myb | युटीआय आणि यीस्ट इन्फेक्शनमध्ये 'हा' आहे फरक, लागण होण्याआधी जाणून घ्या लक्षणं

युटीआय आणि यीस्ट इन्फेक्शनमध्ये 'हा' आहे फरक, लागण होण्याआधी जाणून घ्या लक्षणं

googlenewsNext

महिलांमध्ये होत असलेलं वजायनल इंफेक्शन सध्या खूपच कॉमन समस्या दिसून येते. प्रत्येक महिलेला या इंफेक्शनचा सामना करावा लागतो.  या समस्या वैयक्तीक स्वच्छता नसेल तर जास्त होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला कॉमन हेल्थ फॅक्टर युटीआय आणि वजायनल इंफेक्शन  कसं वेगवेगळं असतं. याबाबत सांगणार आहोत. 

वजायनल यीस्ट इंफेक्शन :  

या प्रकारचं इन्फेक्शन कँडीडा फंगसमुळे होतं. त्यामुळे वजानयात खाज खुजली, जळजळ आणि पांढरं पाणी बाहेर येण्याची समस्या जाणवते. 

यूटीआई 

युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन बॅक्टीरियामुळे मुत्रमार्गात त्रास होतो. यात युनिनरी ट्रॅकला जोडणारे अवयव ब्लॅडर, किडनी, युरेटर यांचा समावेश होतो. ब्लॅडर युरिनरी ट्रॅकचा एक भाग असला तरी  ब्लॅडरमध्ये होणारं इन्फेक्शन हे युटीआयचं नसतं. जेव्हा ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन होतं, तेव्हा या इन्फेक्शनला ब्लॅडर इन्फेक्शन असं म्हणतात. यातील इन्फेक्शन ब्लॅडरपर्यंत मर्यादीत असतं. तुलनेने युटीआय इंन्फेक्शन पूर्ण युरिनरी ट्रॅकला प्रभावित करतं.

लक्षणं

पोटाच्या आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणं, लघवी करताना  जळजळ होणं, शरीराचं तापमान वाढणं, कधी खूप गरम किंवा खूप थंडी वाजणं, उलटीसारखं होणं, वारंवार लघवीला जावं लागणं, लघवीला दुर्गंधी येणं, लघवीचा रंग बदलणं, तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर तपासणी करून घ्या.

युटीआय असो किंवा यीस्ट इन्फेक्शन प्रत्येक महिलेने डॉक्टऱकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पसरत असलेल्या इन्फेक्शला रोखता येऊ शकतं, जर गर्भवती महिलेला  अशा प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर बाळासाठी सुद्धा नुकसानकारक ठरू शकतं. या इन्फेक्शनमुळे गरोदरपणानंतरही समस्येचा सामना करावा लागू शकतो.  वजायनामध्ये बॅक्टेरीया आणि आणि यीस्ट आधीपासूनच असतात. काही कारणांमुळे बॅक्टेरिया आणि यीस्ट यांतील संतुलन बिघडल्यामुळे यीस्टची समस्या वाढून हा आजार वाढत जातो. (हे पण वाचा- CoronaVirus News : आतड्यांमध्ये वेगाने होत आहे कोरोना विषाणूंचा प्रसार, तज्ञांचा खुलासा)

महिलांमध्ये युरिनरी ट्रॅकशी जोडलेली यूरेथ्रा ट्यूब शरीरातील युरीन बाहेर फेकण्याचं काम करत असतात. पुरुषांमध्ये युरेथ्रा लहान असल्यामुळे युरिनरी ट्रॅकच्या जवळ असतात. या कारणामुळेच महिलांच्या युरेथ्रा मार्गातील बॅक्टेरिया सहजतेने वजाइना, ब्लॅडर और युरिनरी ट्रॅकपर्यंत पोहोचतात.  पुरूषांच्या तुलनेत सर्वाधिक महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. ( हे पण वाचा: CoronaVirus News : कोरोनाच्या महामारीत लोकांना घरच्याघरी उद्भवत आहेत 'या' गंभीर समस्या)

Web Title: know the difference between uti yeast and bladder infection know the symptoms myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.