जेवण बनवणे आणि खाण्यासाठी नाही वेळ?, एक्सपर्टकडून जाणून घ्या डाएटचं टाइम मॅनेजमेंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 03:21 PM2019-05-18T15:21:20+5:302019-05-18T15:26:39+5:30

सध्याच्या धावपळीच्या दिवसात सगळेजण ही तक्रार करताना दिसतात की, त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांना हेही माहीत असतं की, चांगल्या आरोग्यासाठी हेल्दी डाएट किती गरजेची आहे.

Know the diet time management from Expert | जेवण बनवणे आणि खाण्यासाठी नाही वेळ?, एक्सपर्टकडून जाणून घ्या डाएटचं टाइम मॅनेजमेंट!

जेवण बनवणे आणि खाण्यासाठी नाही वेळ?, एक्सपर्टकडून जाणून घ्या डाएटचं टाइम मॅनेजमेंट!

Next

(Image Credit : Serotonin Plus)

सध्याच्या धावपळीच्या दिवसात सगळेजण ही तक्रार करताना दिसतात की, त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांना हेही माहीत असतं की, चांगल्या आरोग्यासाठी हेल्दी डाएट किती गरजेची आहे. पण काय कधी खावं हे अनेकांना माहीत नसतं. खासकरून उन्हाळ्यात स्वत:ला डायड्रेट ठेवावं लागतं. त्यासाठी प्याव्या लागणाऱ्या पेयांबाबतही लोकांना माहीत असतं. पण या सगळ्याच्या तयारीसाठी ते वेळ काढू शकत नाही. आज डाएट एक्सपर्ट लवलीन कौर काही सोप्या टिप्स देत आहेत. ज्याने तुम्ही या दिवसात आरोग्य चांगलं सांभाळू शकता. 

लवलीन कौर ही प्रसिद्ध डायटिशिअन असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. ती सांगते की, हेल्दी डाएटला लाइफस्टाइलचा भाग बनवा, डाएटला ड्यूटी करू नका. ड्यूटीमुळे आपल्याला तणाव होतो. पण लाइफस्टाइलमध्ये याची सवय होऊन जाते. 

टाइम मॅनेजमेंट आहे गरजेचा

हेल्दी डाएटसोबत परफेक्ट टाइम मॅनेजमेंटही गरजेचा असतो. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, तुम्ही फळं, हेल्दी ड्रिंक्स आणि सलाद कधी खावेत.जेणेकरून तुम्हाला फायदा व्हावा. यासाठी लवलीनने एक व्हिडीओ शेअर केला असून ज्यात ती हेल्दी समर डाएटबाबत सांगत आहे. 

फळांचं प्लॅनिंग

डायटिशिअन लवलीन कौर सांगते आहे की, जर फळांचं सेवन सकाळी केलं जर त्यांचा जास्त फायदा होतो. यातून आपल्याला फ्रूक्टोज मिळतात. ज्याने आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते. पण त्यासाठी तुम्हाला आधीच तयारी करावी लागेल. त्याबाबतही यात सविस्तर सांगण्यात आलं आहे.

सलाद आणि आरोग्यदायी पेय

लवलीनचं मत आहे की, सलाद खाण्याची वेळ लंचसोबत किंवा लंचनंतर दोन्हीही चांगली आहे. काही पेयांमध्ये जिरं, धणे मिश्रित असतात त्यांच्यामुळे ते सेवन करण्याची वेळही बदलते. 

Web Title: Know the diet time management from Expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.