जीने चढताना दम लागतो? दुर्लक्ष कराल तर पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 10:42 IST2019-12-27T10:23:02+5:302019-12-27T10:42:06+5:30
आपण सध्याच्या काळातील वातावरण पहिलं तर शारीरिक श्रम घेणारे लोक खूप कमी असतात.

जीने चढताना दम लागतो? दुर्लक्ष कराल तर पडेल महागात
आपण सध्याच्या काळातील वातावरण पहिलं तर शारीरिक श्रम घेणारे लोक खूप कमी असतात. मोठमोठ्या शहरात तसंच उपनगरात ८ ते ९ तास बसून काम करणारे लोकं आपल्याला दिसतात. तंत्रज्ञानामुळे आपली सगळी कामं सुखकर आणि सोपी झाली आहेत. असं आपण म्हणतो. पण लहान सहान गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपल्याला तंत्रज्ञानावर अवलंबून राहवं लागतं.
तुम्ही प्रत्येकवेळी लिफ्टचा वापर करून ठरावीक ठिकाणी पो़होचता. हेच जर तुम्हाला चालत जायला लागलं तर दम लागणे, पाय दुखणे. अशा समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. हे संकेत हृद्याशी निगडीत असलेल्या समस्येचे असू शकतात. तुम्हाला जर जीने चढताना जास्त घाम असेल तर हार्ट अर्टकचा येण्याचा धोका असू शकतो. कारण अनेकांना दम लागण्याची समस्या सर्वाधिक जाणवते.
जर तुम्हाला हाय कॉलेस्ट्रॉल, हाय बीपी किंवा लठ्ठपणा, मधुमेह यांपैकी कोणतीही समस्या आहे तर तुम्हाला दम लागण्याचा त्रास जास्त होत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे वारंवार तपासणी करण्याची गरज आहे. जेणेकरून तुम्ही भविष्यात हृदयाविषयी येणार असलेल्या समस्यांना आधीच रोखू शकता. तरी सुद्धा जर तुमच्या छातीत दुखतं असेल तर ते हार्ट अर्टकचं लक्षण आहे. असं म्हणता येणार नाही. पण सगळ्यात जास्त हार्ट अर्टकच्या केसमध्ये छातीत दुखण्याचा त्रास सर्वाधिक उद्भवतो. हे दुखणे फार असह्य असते. पोटाच्या डाव्या बाजूला दुखण्यचा त्रास उद्भवतो.
जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबतच खूप घाम सुद्धा येत असेल. तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण यावेळी जर तुम्हाला थंड घाम येत असेल तर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. व्यायाम करताना जर तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर हे हार्ट संबंधीत आजाराचं लक्षणं असू शकतं.
वारंवार तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्हाला तपासणी करणं आवश्यक आहे. कारण हार्ट संबंधी काही आजार उद्भवत असेल तर मेंदूला रक्तपूरवठा व्यवस्थीत होत नसतो. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. जर रोज तुम्ही सहजतेने जीने चढत असाल आणि दम लागण्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला शारीरिक व्यायाम आणि हालचालीची गरज आहे. तसंच वेळोवेळी मेडीकल चेकअप केल्यास होणार असलेल्या आजारांपासून वाचता येईल.