शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रोज माठातलं पाणी प्याल; तर गंभीर आजारांपासून लांब राहाल, वाचा गुणकारी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 15:14 IST

साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते.  अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा. 

उन्हाळ्याच्या वातावरणात सगळ्यांनाच थंड पाणी प्यावसं वाटतं असतं. घरोघरी सर्रास उन्हाळ्याच्या ४ महिन्यात फ्रिजचं थंड पाणी प्यायलं जातं.  खूप कमी लोकांच्या घरी उन्हाळ्यात सुद्धा माठातलं पाणी पितात. तुमचा विश्वास बसणार नाही पण माठातलं पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. सध्या कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रसारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते.  अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा. 

माठातील पाणी प्यायल्यामुळे त्वचेसंबंधी समस्या दूर होतात.  पुळ्या, मुरूम, त्वचेसंबंधित इतर आजार दूर होतात. त्वचा चमकदार दिसते.  माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्याच्या समस्या होत नाहीत.

घरी बसून जर तुम्हाला पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल म्हणजेच पोट साफ न होणं, एसिडिटी होणं, छातीत जळजळणं अशा समस्या उद्भवत असतील तर फ्रिजमधील पाण्याचे सेवन करू नका. थंडगार फ्रिजचे पाणी पिण्यामुळे तुमची पचनसंस्था मंदावते. ज्याचा चुकीचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिजमवर होतो. मातीच्या भांड्यातील पाण्यामुळे एसिडिटीचा त्रास कमी होतो. म्हणून माठातलं पाणी प्यायला सुरूवात करा.

(image credit- brett cole)

फ्रिजमधलं  पाणी हे प्लास्टिकच्या  बाटल्यांमध्ये साठवून  ठेवावे लागतात. ज्यामुळे त्या पाण्यात प्लास्टिक अथवा इतर घटक मिसळतात. मात्र माठातील पाण्यात कोणतेही केमिकल्स नसतात. मातीच्या भांडयातील थंड पाणी पिण्यामुळे सर्दी,खोकला, घशाचे इनफेक्शन, ताप अशा समस्या उद्भवत नाहीत.  कोरोनाच्या महामारीत लहान मोठ्या आरोग्याच्या तक्रारींपासून लांब राहायचं असेल तर या माठातल्या पाण्याचे सेवन करा. 

 'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत

कोरोनामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडतंय? तज्ज्ञांनी केला खुलासा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणी