कोरोनामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडतंय? तज्ज्ञांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:34 PM2020-05-17T17:34:51+5:302020-05-17T17:43:55+5:30

कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Coronavirus Symptoms is mentally disability covid 19 signs like psychosis in patients myb | कोरोनामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडतंय? तज्ज्ञांनी केला खुलासा

कोरोनामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडतंय? तज्ज्ञांनी केला खुलासा

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  साधा ताप, सर्दी असेल तरी लोकांना कोरोनाची भीती वाटते. कोरोनाच्या माहामारीमुळे लोकांच्या शारीरिक स्थितीसोबतच मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम होत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जगभरात करण्यात आलेल्या १४ रिसर्चनंतर संशोधकांना दिसून आलं की, कोरोनाचं संक्रमण झालेल्या काही रुग्णांना आवाज ऐकू येत आहेत. याशिवाय वेगवेगळे भास होत आहेत.  कोरोनाच नाही तर सार्स, मर्स,आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसून आली होती.


सायकोसिक

सायकोसिस  ही एक मानसिक स्थिती असून असामान्य अवस्था आहे. यामुळे पिडीत व्यक्तीचा वास्तविकता आणि  आभासी घटना यातील फरक कळत नाही. त्यामुळे व्यक्तीला भ्रमांवर सुद्धा विश्वास बसतो. अशा लोकांना सामान्य माणसांना ऐकू येत नसलेले आवाज सुद्धा ऐकू येतात. तसंच वेगवेगळ्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टीसुद्धा दिसायला लागतात. खरं पाहता रुग्णांच्या मानसिक अवस्थेत बिघाड झाल्यामुळे अशी समस्या उद्भवते. अमेरिकेतील आरोग्य संस्था सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या लक्षणांमध्ये वास आणि चव न समजणं यांचा सुद्धा समावेश आहे. 

कोरोना रुग्णांना बोलताना त्रास होणं, रक्त गोठणं अशी लक्षणं दिसून येत आहेत. हे संशोधन करत असलेले तज्ज्ञ प्रो. रिचर्ड ग्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांमध्ये वाढत्या ताणामुळे सायकोसिसची समस्या उद्भवत आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ताण-तणाव आणि अस्वस्थता दूर करणं गरजेचं आहे. सतत विचार केल्यामुळे आणि भयभीत झाल्यामुळे रुग्णांच्या मनावर परिणाम होत आहे.

एंटी-साइकोटिक औषधं

डॉ. एली ब्राउन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णांना एंटी-साइकोटिक औषधांचा डोस देऊन उपचार केले जाऊ शकतात. त्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये चांगला संवाद असणं गरजेचं आहे. जेणेकरून रुग्णांची मानसिक स्थिती उत्तेजित  झाल्यानंतर किंवा बिघडल्यानंतर त्यांना समजवता येऊ शकतं. अशा प्रकारची लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. 

(उन्हाळ्यात फंगल इन्फेक्शनच्या त्रासाने हैराण आहात? तर 'या' उपायांनी मिळवा त्रासापासून सुटका)

(कोरोनाला रोखणारी आणि सर्वसामान्यांना परवडणारी लस 'या' महिन्यापर्यंत येणार, तज्ज्ञांचा दावा)

Web Title: Coronavirus Symptoms is mentally disability covid 19 signs like psychosis in patients myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.