'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:20 PM2020-05-18T12:20:27+5:302020-05-18T12:23:17+5:30

दोन औषधांना एकत्र करून वेगळे औषध तयार करण्यात येणार आहे.

Corona patients are being cured by this drug experts says myb | 'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत

'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण कोरोनामुळे मृत्यू  होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञांचे कोरोनावर औषधं शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलिकडे बांग्ला देशातील डॉक्टरांनी कोरोनावर औषध शोधण्याचा दावा केला आहे. बांग्ला देशातील मेडिकल टीमने असा दावा केला आहे की, दोन औषधांना एकत्र करून  हे  वेगळं औषध तयार करण्यात येणार आहे. दोन औषधांपासून तयार  करण्यात आलेल्या एंटीडोट मुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसत असलेले रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. 

जगभरातील सर्वच देशातील शास्त्रज्ञ अयशस्वी प्रयोगांमुळे निराश झाले असताना बांग्ला देशातील तज्ज्ञांनी लस विकसीत करण्याचा दावा केला आहे.  बांग्ला देशातील मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटलचे मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉक्टर मोहाम्मद तारेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन औषधांना एकत्र करून तयार झालेल्या एंटीडोटमुळे ६० रुग्ण बरे झाले आहेत.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एंटीबायोटिक, डॉक्सीसाइक्लिनसोबत सिंगल डोस इवरमेक्टिन एंटीप्रोटोजोअल औषधाचा वापर केला जातो. त्यामुळे कोरोना रुग्णांची प्रकृती सुधारण्यास मदत होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांचा आकडा  बांग्ला देशमध्ये २२ हजार २६८ वर पोहोचला आहे. तसंच जगभरातील कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन लाखापेक्षा जास्त आहे.

(कोरोना विषाणूंमुळेच नाही तर 'या' समस्येमुळे होतो श्वास घ्यायला त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणं)

(कोरोनामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडतंय? तज्ज्ञांनी केला खुलासा)

Web Title: Corona patients are being cured by this drug experts says myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.