Know the bad effects of social media on children | मुलांचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करण्याचं 'हे' कारण ठरू शकतं घातक  
मुलांचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करण्याचं 'हे' कारण ठरू शकतं घातक  

(Image credit- shield health care)

सध्याच्या काळात कोणत्याही वयोगटात मोबाईलचा सर्वात जास्त वापर होताना दिसून येतो. कारण काही पालकच मुलांच्या या सवयींसाठी करणीभूत ठरतात. अलिकडेच एका रिसर्चमध्ये  लहान मुलांच्या आरोग्याबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. सोशल मिडीयाच्या जास्त वापरामुळे मुलांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि त्याचे संतुलन बिघडत आहे. तरुण मुलांमध्ये सोशल मिडीयाचा जास्त वापर इन्स्टाग्रामवर फोटोज पोस्ट करण्यासाठी होतो. पोस्ट केल्यानंतर लाईक्स कमी येणे. हे नैराश्याचं कारण ठरतं.


(image credit- Mumset) 

तरुण मुलांमध्ये सोशल मिडीयाच्या अती वापरामुळे अॅग्जाइटी , डिप्रेशन यांसारखे आजार वाढत आहेत. सातवी आणि आठवीतील मुलं ही सोशल मिडीयामुळे सर्वाधिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहेत. ५१.५% मुलं  आणि ४५ % मुलींची शारीरिक स्थीती ही अनुकूल नाही. काही जणांना वजन न वाढण्याची समस्या आहे तर काही जणांना लठ्ठपणाची समस्या आहे. मोबाइल आणि कॉम्प्युटरचे फायदे आहेत, तसेच त्याचे आरोग्यावरील दुष्परिणामही समोर आले आहेत. अनेकदा दिवसभर कम्प्युटरचा केल्यामुळे आपल्याला थकवा येतो. त्यामुळे डिप्रेशन, हार्ट अॅटॅक यांसारख्या आरोग्याच्या समस्या अत्यंत कमी वयात तरुणांमध्ये दिसू लागल्या आहेत. तसेच मोबाइलच्या अतिवापरामुळे रेडीएशनचा त्रास होतो त्यातून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.


 (image credit- the rampage online)

रिर्सच नुसार लोकं सोशल मिडीयावर जितका जास्त वेळ घालवतात. तितकंच त्यांना डिप्रेशनला सामोरे जावे लागतं. स्मार्टफोनमुळे प्रत्यक्ष संवाद कमी होतो. आणि मुलं नेहमी फोनवरच बिझी राहतात. त्यामुळे मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जेवताना मुलं जर फोनचा वापर करत असतील तर त्यांना वेळीच आवर घाला.कारण जर फोनचा वापर करत असताना जेवण केल्यास खाल्लेले अंगाला लागत नाही. त्यातून आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्धवतात. मुलांच्या समोर स्वःत मोबाईलचा अतिवापर करणे टाळा. जेणेकरून मुलं मोबाईलचा वापर करणं टाळतील.

Web Title: Know the bad effects of social media on children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.