टाईमपास म्हणून ओठांची किंवा बोटांची त्वचा कुरतडता का? हा आहे स्किन पिकिंग आजाराचा संकेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:32 IST2020-02-20T10:17:17+5:302020-02-20T10:32:00+5:30
केस, नखं आणि त्वेचेवर हे स्किन पिकिंग होत. जेव्हा जखम झाल्यानंतर इन्फेक्शन होत. त्यावेळी खाज येत असते. तेव्हा हा प्रकार वाढत जातो.

टाईमपास म्हणून ओठांची किंवा बोटांची त्वचा कुरतडता का? हा आहे स्किन पिकिंग आजाराचा संकेत...
(image credit-adobe stock)
साधारणपणे अनेक लहान मोठे आजार असे असतात. जे अनेकदा उद्भवतात पण आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नसते. तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की अनेक लोक बसल्याबसल्या आपल्या ओठांची कातडी काढत असतात. किंवा नखांच्या आजूबाजूची त्वचा खेचतं असतात. मेडिकलच्या परीभाषेत याला स्किन पिकिंग डिर्सोडर असं म्हणतात. पिंपल्स झाल्यानंतर सतत त्या जागेला हात लावणे. त्या भागातील घाण साफ करण्यासाठी सतत त्या जागी कोरणे, किंवा कोणतंही कारण नसताना जर आपण त्वचेला स्पर्श करत असू तर एकाप्रकारे स्किन पिकिंग डिसॉर्डरचा धोका असतो. त्यात सगळ्यात कॉमन दिसून येत असलेले म्हणजे ओठांची त्वचा जर कोरडी झाली असेल तर नखांनी कुरतडणे.
तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण अनेक लोक आपला दिवस स्किन पिकिंग करण्यात घालवतात. अशात ब्लिडिंग सुद्धा होतं किंवा दुखण्याचा त्रास जाणवतो. स्किन पिकिंगची एकदा सवय लागली तर कितीही प्रयत्न केला तरी ही सवय मोडता येत नाही. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या सगळ्यात जास्त दिसून येते. स्किन पिकिंग या आजाराची लक्षणं पुढिलप्रमाणे आहेत.
त्वचेला सतत हात लावणे.
जखमेला सतत कोरणे.
ताण तणाव आणि कोणतंही काम करत असताना लक्ष त्वचेकडे असणे.
केस, नखं आणि त्वचेवर हे स्किन पिकिंग होतं.
जेव्हा जखम झाल्यानंतर इन्फेक्शन होत. त्यावेळी खाज येत असते. तेव्हा हा प्रकार वाढत जातो.
अनेकदा लोक नखांच्या आजूबाजूची त्वचा काढायला सुरूवात करतात. कारण नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला खाजवल्यामुळे लोकांना सॅटिस्फिकेशन मिळत असतं. बायोलॉजीकल आणि इंवारमेंटल गोष्टी या स्थितीला जबाबदार असतात. स्किन पिकिंग डिसॉर्डरच्या ट्रिटमेंटसाठी मेडिकेशन, थेरेपीचा वापर केला जातो. या ट्रिटमेंटच्या सहाय्याने तुम्ही या सवयींपासून सुटका मिळवू शकता. स्ट्रेस मॅनेजमेंट्च्या सहाय्याने सुद्धा तुम्ही स्वतःला या आजारापासून लांब ठेवू शकता. ( हे पण वाचा-दूध की ज्यूस...सकाळचं पहिलं ड्रिंक म्हणून काय हेल्दी ठरेल?)
(image credit- web MD)
अशी घ्या काळजी
जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा स्किन पिकिंग करण्याची इच्छा झाल्यास स्वतःला कंट्रोल करा.
त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळाच्या तेलाचा किंवा एलोवेरा जेलचा वापर करा.
नियमीत व्यायाम करा.
ताण-तणाव स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा करा. ( हे पण वाचा-रात्री येणाऱ्या खोकल्यामुळे झोपेचं खोबरं होऊ द्यायचं नसेल तर वेळेवर करा 'हे' सोपे उपाय!)