युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 12:06 PM2020-07-29T12:06:06+5:302020-07-29T12:18:04+5:30

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतासह जगभरातील ४ असे देश  आहेत. ज्या देशात २ लसींवर काम करण्यात येत आहे. 

know about country wise human trial status of covid 19 vaccine candidate | युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

Next

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी जगभरातील देश लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. यापैकी कोणत्या देशातील लसींची परिक्षण कोणत्या टप्प्यात पोहोचली आहेत. तसंच लस कधीपर्यंत दिली जाणार याबाबत आम्ही आज माहिती देणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतासह जगभरातील ४ असे देश  आहेत. ज्या देशात २ लसींवर काम करण्यात येत आहे. 

यूएसए

संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील मॉडर्ना इंक कंपनी MRNA-1273 नावाने लस तयार करत आहे. या लसीचे ह्यमुन ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय अमेरिकन कंपनी फायजर आणि जर्मन कंपनी बायोएमटेकने मिळून एक लस तयार केली आहे. ही लस RNA प्लॅटफॉर्मवर विकसित होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मानवी परिक्षणास सुरूवात झाली आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणासाठी परवागनी मिळण्याची वाट पाहिली जात आहे. 

यूके

युके मध्ये कोरोना विषाणूंच्या दोन लसी विकसीत केल्या जात आहे. पहिली लस ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची AZD-1222  ही आहे. Non-replicating virus प्लॅटफॉर्मवर ही लस विकसीत केली जात आहे. आता भारतात परिक्षण सुरू करण्यासाठी परवागनी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. याच देशात इंम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडनची SELF-AMPIFYING RNA VACCINE चे मानवी परिक्षण केले जात आहे. MRNA प्लॅटफॉर्मवर ही लस विकसीत होत आहे. 

भारत

भारतात हैदराबादत येथिल भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सिन तयार करत आहेत.  या लसीचे फेज १ आणि फेज २ चे ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. या लसीचा प्लॅटफॉर्म Inactivated virus आहे.  याशिवाय Zydus Cadila कंपनीची ZyCOV-D ची चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. 

चीन

चिनच्या सिनोवॅक कंपनीची लस शर्यतीत सगळ्यात पुढे आहे.  सगळ्यात आधी या देशात माहामारी पसरल्यामुळे व्हायरसची लस तयार करण्यासाठी सगळ्यात जास्त सॅपल्स या कंपनीला मिळले. सिनोवॅक बायोटेकने लसीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. याशिवाय ज्या शहरातून कोरोना व्हायरस पसरला त्या ठिकाणी वुहान इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स ने सिनोफार्म (Sinopharm) नावाने लस तयार केली आहे. आतंरराष्ट्रीय  स्तरावर ही लस लॉन्च करण्यासाठी ३ वैद्यकिय परिक्षणांना सुरूवात केली आहे. 

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नची लस सुद्धा या शर्यतीत पुढे आहे. तज्ज्ञांनी नऊ वर्ष आधीच्या टीबीच्या औषधाचा वापर करत कोरोनाची लस तयार केली आहे. चाचणीदरम्यान या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. सुरूवातीच्या दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण होऊन आता लसीचे शेवटच्या टप्प्यातील ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. 

रशिया

रशियातही दोन लसी चाचणीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत.  लस Gamaleya Research Institute ची आहे. या लसीला आयसोलेट स्टेन प्लॅटफॉर्मवर विकसित केले जात आहे.पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली असून आता अंतीम टप्प्यातील चाचणी पूर्ण होणार आहे.

कॅनडा  

Medicago, GSK , Dynavax या कंपन्या मिळून प्लाट बेस्ड् एक लस विकसित करत आहेत. या लसीचे मानवी परिक्षण पहिल्या टप्प्यात असून- ही लस  Virus-Like Particle (VLP) प्लेटफॉर्मवर तयार होत आहे. 

कोरोनाच्या लढ्यात ५ पैकी ३ लसी चीनी कंपनीच्या; लसीच्या शर्यतीत चीन बाजी मारणार? जाणून घ्या

खुशखबर! कोरोनाचं 'हे' औषध ऑगस्टमध्ये येणार, किंमत आणि कुठे उपलब्ध होणार, जाणून घ्या

Web Title: know about country wise human trial status of covid 19 vaccine candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.