Kidney: किडनी खराब होऊ नये यासाठी नियमित या ज्यूसचं करा सेवन, स्टोनची समस्याही होणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:57 IST2022-08-08T16:54:28+5:302022-08-08T16:57:13+5:30
Kidney Detox Drinks: किडनी हेल्दी ठेवण्यासाठी किडनी डिटॉक्स करणंही गरजेचं असतं. अशात तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही ड्रिंक्सचा समावेश करू शकता. चला जाणून कोणत्या ज्यूसचं सेवन करून तुम्ही किडनी डिटॉक्स करू शकता.

Kidney: किडनी खराब होऊ नये यासाठी नियमित या ज्यूसचं करा सेवन, स्टोनची समस्याही होणार नाही!
Kidney Detox Drinks: किडनी आपल्या शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे जो शरीरातील वेगवेगळ्या क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतो. त्यामुळेच किडनी हेल्दी ठेवणं फार गरजेचं असतं. तेच किडनी हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी डाएट आणि भरपूर प्रमाणात पाणी पिऊनच तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनी खराब होण्याचा धोका कमी राहतो. इतकंच नाही तर किडनी हेल्दी ठेवण्यासाठी किडनी डिटॉक्स करणंही गरजेचं असतं. अशात तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही ड्रिंक्सचा समावेश करू शकता. चला जाणून कोणत्या ज्यूसचं सेवन करून तुम्ही किडनी डिटॉक्स करू शकता.
apple vinegar पासून तयार ड्रिंक्स - apple vinegar मध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि सिड्रिक अॅसिड असतं जे किडनी स्टोनला डिसॉल्व करण्यासोबतच टॉक्सिनला दूर करतं. तुम्ही याच्या मदतीने एक डिटॉक्स ड्रिंक तयार करू शकता. यासाठी एका ग्लाल कोमट पाण्यात एक चमचा apple vinegar टाका. रोज याचं सेवन करा. याच्या सेवनाने तुमची किडनी डिटॉक्स होत राहणार.
डाळिंबाचा रस - डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं आणि त्यामुळे याने किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर यातील गुण किडनी स्टोन होण्यापासूनही रोखतात. किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही रोज डाळिंबाच्या रसाचं रोज सेवन करू शकता.
बिटाचा रस - बिटाच्या रसामध्ये बीटाइन असतं जे फार फायदेशीर फायटोकेमिकल आहे. सोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट गुणही असतात. अशात जर तुम्ही नियमितपणे बिटाच्या रसाचं सेवन केलं तर किडनी डिटॉक्स होण्यासोबतच तुमच्या किडनी स्टोनचा धोकाही राहत नाही.