कॅन्सरमुळे व्यंधत्व आलेल्या पुरुषांसाठी चांगली बातमी! स्पर्म तयार करणाऱ्या चिपचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:38 IST2022-06-07T17:15:41+5:302022-06-07T17:38:49+5:30
शास्त्रज्ञांनी एका छोट्याशा चिपने स्पर्मची निर्मिती केली आहे. शास्त्रज्ञांनी अशी मायक्रोचिप तयार केली आहे, जी कृत्रिमरित्या शुक्राणू तयार करू शकते (Sperm from silicon chip).

कॅन्सरमुळे व्यंधत्व आलेल्या पुरुषांसाठी चांगली बातमी! स्पर्म तयार करणाऱ्या चिपचा शोध
पुरुषांमध्येही काही कारणामुळे वंध्यत्व येतं. ज्यामुळे त्यांना मूल होत नाही (Infertility in Men). पण आता असंच वंध्यत्व आलेल्या पुरुषांसाठी आशेचा किरण आहे ती एक छोटीशी चीप. शास्त्रज्ञांनी एका छोट्याशा चिपने स्पर्मची निर्मिती केली आहे. शास्त्रज्ञांनी अशी मायक्रोचिप तयार केली आहे, जी कृत्रिमरित्या शुक्राणू तयार करू शकते (Sperm from silicon chip).
इज्राइल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि बेन गुरियन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही शुक्राणूंची निर्मिती करणारी मायक्रोचीप तयार केली आहे. ही मायक्रोचिप बनवण्यासाठी एका सिलिकॉप चिपचा उपयोग करण्यात आला आहे. जी मायक्रोफ्लुइडिक सिस्टममार्फत लॅबममध्ये शुक्राणू बनवण्याच्या प्रक्रियेत मदत करते. ही मायक्रोचिप अशा कॅन्सर रुग्णांना फायदेशीर ठरेल ज्यांच्या प्रजननक्षमतेवर केमोथेरेपीमुळे परिणाम झाला आहे. केमोथेरेपीमुळे त्यांना वंध्यत्व आलं आहे किंवा ते मुलाला जन्म देण्यात सक्षम नाहीत.
बेन-गुरियन यूनिव्हर्सिटीतील माइक्रोबायोलॉजी, इम्यूनोलॉजी आणि जेनेटिक्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक महमूद हुलेहेल यांनी सांगितलं, शुक्राणू पेशींची निर्मिती करण्यासाठी आम्ही लॅबमध्ये अशा प्रक्रियेचा प्रयत्न करत होतो जी कॅन्सर पीडित रुग्णांच्या शरीरातील कॅन्सर पेशींना होणाऱ्या हानीपासून रोखू शकेल.
या चीपचा उंदरांवर प्रयोग करून पाहिला. ज्या उंदरांमध्ये शुक्राणू पेशींची निर्मिती होत नव्हती त्यांच्या अंडकोषात शुक्राणूंची निर्मिती करण्यासाठी सिलकॉन चिपचा वापर करून प्रयत्न करण्यात आले. याशिवाय लॅबमध्ये अशाच बऱ्याच सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, ज्या शूक्राणू निर्मितीसाठी नैसर्गिकरित्या मिळतात. ज्यामुळे लॅबमधील वृषण पेशीत संवर्धन प्रक्रिया विकसित करणं शक्य झालं.
शुक्राणू निर्मितीसाठी खास 3डी चिपचा उपयोग करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार ही मायक्रोचिप तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पीअर रिव्ह्यू जर्नल बायोफॅब्रिकेशनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.