रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का? आठवड्यातून किती तास पुरेसे ठरतील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:38 IST2025-04-10T15:37:39+5:302025-04-10T15:38:22+5:30
Fitness tips : तसं पहायला गेलं तर एक्सरसाईज करण्यामागचा उद्देश शरीर अॅक्टिव ठेवणं आहे. यासाठी सतत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करण्याची गरज नाही.

रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का? आठवड्यातून किती तास पुरेसे ठरतील?
Fitness tips : लोक आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोज एक्सरसाईज करण्याकडे भर देतात. इतकंच नाही तर अनेकांना असं वाटतं की, हेल्दी राहण्यासाठी रोज एक्सरसाईज केली पाहिजे किंवा जिममध्ये जायला हवं. पण अनेक एक्सपर्ट असं सांगतात की, फिट राहण्यासाठी रोजच तासंतास एक्सरसाईज करावी असं काही नाही. त्याऐवजी आपल्या रोजच्या जगण्यातील काही सवयी बदलूनही तुम्ही फिटनेस चांगली ठेवू शकता.
तसं पहायला गेलं तर एक्सरसाईज करण्यामागचा उद्देश शरीर अॅक्टिव ठेवणं आहे. यासाठी सतत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही इतरही काही गोष्टी करू शकता. जसे की, कधी कधी बिल्डींगच्या पायऱ्या चढणं आणि उतरणं, 30 ते 40 मिनिटं वॉक करणं, काम करत असताना छोटे छोटे ब्रेक घेऊन वॉक किंवा हालचाल करणं या गोष्टीही खूप फायदेशीर ठरतात.
एका रिपोर्टनुसार, तुम्ही शरीराची जास्त मेहनत करण्यापेक्षा किंवा जास्त स्ट्रेस घेण्याऐवजी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतूनही तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. तुम्ही जर कामात जास्त वेळ बिझी राहत असाल तर या टिप्स नक्कीच तुमच्यासाठी कामात येऊ शकतात. सोबतच तुम्हाला तुम्ही शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, असा गिल्टही येणार नाही.
रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का?
रोज जगणं सगळ्यांचं वेगवेगळं असतं. एखाद्याला कामाला कधी जास्त उशीर लागू शकतो तर एखादं काम लवकर पूर्ण होतं. कधी जास्त कामामुळे थकवा येतो तर कधी एक्सरसाईज करण्याचा मूड नसतो. अशात एक्सपर्ट सांगतात की, रोज एक्सरसाईज केलीच पाहिजे असं काही नाही. स्वत:वर दबाव टाकण्याऐवजी शरीराची गरज समजून घेतली पाहिजे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस एक्सरसाईज करूनही तुम्ही फिट राहू शकता.
छोट्या गोष्टींचा मोठा प्रभाव
नेहमीच जिमला जाण्याची किंवा रोज खूप जास्त एक्सरसाईज करण्याची गरज नसते. रोज तुम्ही पायी चालणे, पायऱ्या चढणं-उतरणं, सतत बसण्याऐवजी उभं राहून काम करणं या गोष्टींमुळेही तुम्ही फिट राहू शकता. या गोष्टी करूनही तुम्ही बॉडी फिट ठेवू शकता आणि कॅलरी बर्न करू शकता.
खाणं-पिणंही तेवढच महत्वाचं
शरीराचं फिटनेस चांगलं ठेवणं यासाठी केवळ एक्सरसाईज ही एकच बाब नाही. एक्सरसाईजसोबतच पौष्टिक आणि संतुलित आहार घेणंही तेवढंच महत्वाचं ठरतं. आहारात फायबर, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन आणि आयर्न यांचा समावेश असला पाहिजे. जंक फूड, शुगर असलेल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तसेच दिवसभर भरपूर पाणी पिणंही गरजेचं असतं.
आठवड्यातून 150 मिनिटं पुरेसे
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी रोज दोन तास जिममध्ये घाम गाळण्याची अजिबात गरज नाही. WHO आणि हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, तुम्ही आठवड्यातून केवळ 150 मिनिटं हलकी शारीरिक हालचाल करूनही फिट राहू शकता. यासाठी तुम्ही पायी चालणं, धावणं, डान्स करणं या गोष्टी करू शकता. ही वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार विभागून घेऊ शकता. जसे की, रोज 30 मिनिटं किंवा आठवड्यातून 5 दिवस. नियमितता महत्वाची आहे.