शिंकताना जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 09:23 AM2024-06-24T09:23:44+5:302024-06-24T09:24:25+5:30

जास्तीत जास्त लोक शिंक रोखतात. तर काही लोक शिंकण अशुभ मानतात. पण शिंका रोखणं तुम्हाला महागात पडू शकतं.

Is Holding in a Sneeze Dangerous? | शिंकताना जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, वेळीच व्हा सावध!

शिंकताना जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, वेळीच व्हा सावध!

शिंका येण्याची वेगवेगळी कारणे असतात. कधी कधी सर्दीमुळे किंवा कधी धुळीमुळे शिंका येतात. शिंका येणे चांगली बाब आहे. कारण शिंकताना नाकातून बॅक्टेरिया बाहेर निघतात. पण अनेकदा ऑफिसमध्ये किंवा चार चौघात लोकांचं लक्ष आपल्याकडे जाऊ नये म्हणून लोक शिंक रोखून धरतात.

जास्तीत जास्त लोक शिंक रोखतात. तर काही लोक शिंकण अशुभ मानतात. पण शिंका रोखणं तुम्हाला महागात पडू शकतं. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंक रोखल्यानंतर एका व्यक्तीच्या घशात छिद्र पडलं. 

शिंक रोखणं धोकादायक

३० वर्षीय व्यक्तीने ड्रायव्हिंग करतेवेळी नाक आणि तोंड बंद करून शिंक रोखली. त्याला इतक्या जोरात शिंक आली होती की, त्याच्या घशात ०.०८ इंचाचं छिद्र पडलं. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. एक्सपर्टनुसार, शिंकताना नाक आणि तोंड बंद केलं तर वायु मार्गात दबाव २० टक्क्यांनी वाढू शकतो.

कुणाला जास्त धोका

उपचारानंतर समजलं की, व्यक्तीला सर्जिकल एम्फिसीमा आहे. ही एक अशी समस्या आहे ज्यात हवा तुमच्या त्वचेच्या आत सगळ्या खोलवर असलेल्या टिश्यूमध्ये जाऊन अडकते. सिटी स्कॅनमधून समोर आलं की, छिद्र व्यक्तीच्या मानेच्या त्वचेच्या तिसऱ्या आणि चौथ्या थरामध्ये पडलं होतं. छातीत फुप्फुसामध्ये हवा जमा होत होती.

ही अशा पद्धतीची पहिलीच घटना आहे त्यामुळे या केसचा डॉक्टरांना रिसर्चसाठी उपयोग झाला. रिसर्चर्सनी सांगितलं की, व्यक्तीला एलर्जिक रायनायटिस समस्या आहे. या समस्येला हे फीवर म्हणतात. यात जेव्हा व्यक्ती पराग कणांच्या संपर्कात येते तेव्हा त्याच्या नाकात जळजळ होऊ लागते.

मानेत येऊ शकते सूज

सध्या एक चतुर्थांश ब्रिटिश लोक हे फीवरने प्रभावित आहेत. याने शिंका, खाज, वाहतं नाक, लाल डोळे आणि डोळ्यातून पाणी येणे, घशात खाज आणि खोकला अशा समस्या होतात. शिंकल्याने वायु मार्गात दबाव वाडतो. घशात सूज येऊ शकते.

शिंकणं गरजेचं

रिपोर्टचे मुख्‍य लेखक डॉ. रासादास निसिरोव्‍स यांनी सांगितलं की, शिंका रोखून धरू नये. शिंकल्याने जळजळ निर्माण करणारे पदार्थ नाकावाटे बाहेर पडतात. लाळ, कफसारखे व्हायरल तयार करणारे तत्व दुसऱ्यांपर्यंत जाऊ नये यासाठी हाताने नाक किंवा तोंड हलकं झाकलं पाहिजे.

Web Title: Is Holding in a Sneeze Dangerous?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.