PM मोदींनी शेअर केला 'या' खास आसनाचा VIDEO; वेट लॉस, हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी! आणखीही बरेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 04:50 PM2024-06-19T16:50:24+5:302024-06-19T16:52:06+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासने करण्याची पद्धत आणि त्यांचे फायदे शेअर केले आहेत.

international yoga day 2024 PM Modi shared VIDEO of shashankasana Effective for weight loss, heart health and Many more benefits | PM मोदींनी शेअर केला 'या' खास आसनाचा VIDEO; वेट लॉस, हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी! आणखीही बरेच फायदे

PM मोदींनी शेअर केला 'या' खास आसनाचा VIDEO; वेट लॉस, हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी! आणखीही बरेच फायदे

देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (२१ जून) तयारीला सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासने करण्याची पद्धत आणि त्यांचे फायदे शेअर केले आहेत. त्यांनी आज शशांकासनासंदर्भात माहिती शेअर केली आहे. यालाच रॅबिट पोझही म्हटले जाते. तर जाणून घेऊयात, शशांकासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे...

शशांकासन करण्याची योग्य पद्धत -
- शशांकासनाला रॅबिट पोज असेही म्हटले जाते. कारण यात शरीराचा आकार एखाद्या सशा प्रमाणे होतो.
- हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनाच्या स्थितीत बसा. अर्थ, आपले पाय गुडघ्यात वाकवा आणि नंतर हीप तळव्यावर टेकवून बसा.
- आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा
- आता दोन्ही गुडघे शक्य तेवढे पसरवा.
- यावेळी, पायांचे अंगढे एकमेकांना स्पर्श केलेले असावेत.
- आता तळवे दोन्ही गुडघ्यांच्या मधे जमिनीवर ठेवा आणि श्वास सोडा.
- आता हात समोरच्या बाजूला सरकवा आणि तोंड समोर ठेवा.
- अशा स्थितीत चेहरा समोर आणि हनुवटी जमिनीवर असावी. तसेच हात एका रेषेत समोर असावेत.
- काही वेळ याच स्थितीत राहा आरामात राहा. तसेच सामान्य पणे श्वास घ्या आणि सोडा.
- यानंतर सामान्य वज्रासनाच्या स्थितीत या आणि पाय एका बाजूला करून सरळ करा. 

शशांकासनाचे फायदे - 
- शशांकासन रोज केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.
- ज्या लोकांना कंबरेच्या वरच्या भागात त्रास होतो अथवा पाठदुखीचा त्रास होतो. त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.
- तणाव दूर करण्यासाठी आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठीही फायद्याचे आहे शशांकासन.

या लोकांनी करू नये? 
- उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी हे आसन टाळावे.
- संधिवात किंवा गुडघेदुखीचा त्रास असलेल्यांनीही शशांकासन करणे टाळावे.
- ज्या लोकांना कंबर आणि पाठदुखीचा अधिक त्रास होतो. त्यांनीही हे आसन करणे टाळावे.

Web Title: international yoga day 2024 PM Modi shared VIDEO of shashankasana Effective for weight loss, heart health and Many more benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.