International Yoga Day 2021 : योग म्हणजे काय आणि काय आहे याचा इतिहास?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 04:11 PM2021-06-19T16:11:47+5:302021-06-19T16:23:51+5:30

International Yoga Day 2021 : योगाचा इतिहास (Yoga History) अनेकांना माहीत नसतो. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तान आम्ही तुम्हाला योगाचा इतिहास आणि त्यासंबंधी महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत.

International Yoga Day 2021 : Yoga history, development and everything you should know | International Yoga Day 2021 : योग म्हणजे काय आणि काय आहे याचा इतिहास?

International Yoga Day 2021 : योग म्हणजे काय आणि काय आहे याचा इतिहास?

googlenewsNext

२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा केला जातो. योगाभ्यास किंवा योगा (Yoga) ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. योगाला हजारो वर्षांचा इतिहास तर आहेच सोबतच योग भारताच्या प्राचीन पंरपरेचा भाग आहे. आजकाल बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांच्या आयुष्यात ताणतणाव वाढले आहेत. धावपळ वाढली आहे. मानसिक आणि शारीरिक तणाव वाढला आहे. अशात लोकांना योगा करून मोठा फायदा मिळतो. पण योगाचा इतिहास (Yoga History) अनेकांना माहीत नसतो. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तान आम्ही तुम्हाला योगाचा इतिहास आणि त्यासंबंधी महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत.

योग म्हणजे काय?

योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे. ज्यात अवघड श्वसन प्रक्रिया केल्या जातात. अवघड शारीरिक व्यायाम केले जातात. मात्र, मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली.

योगाचा इतिहास

प्राचीन काळापासून योगा महत्व आहे. भारतात याची सुरूवात झाली आणि साऱ्या जगाला याच महत्व समजलं आहे. योगाचा इतिहास दहा हजार वर्षापेक्षा जास्तचा आहे. अनेक प्राचीन ग्रंथामध्ये याचा महत्वपूर्ण उल्लेख आढळतो. याचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती संस्कृतीचं दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकता दाखवते. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे. यात योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.

जैन धर्मातील पांच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योग सूत्रामध्ये आहेत. योग हा काही धर्म किंवा शिक्षण पद्धती नाही तर ती एक जगण्याची पद्धती आणि एकप्रकारचे तत्त्वज्ञान आहे. योग केल्यामुळे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक पातळीवरही फायदा होत असल्याचे योग करणारे अगदी शपथेवर सांगतील.

जगभरात कुणी पोहोचवला योगा

१७०० -१९०० या काळात योगाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. अनेक योगाचार्य भारतात योगाचा प्रसार करत होते. त्यात रामना महर्षी, रामकृष्ण परमहंस, परमहंस योगानंद, स्वामी विवेकानंद यांचा समावेश आहे. त्यांनीच राज योगा विकसित केला. जगभरात योगाची ही भारतीय संस्कृती पोहोचवण्यात स्वामी शिवानंद, श्री.टी.क्रिष्णमाचार्य, स्वामी कुवलयानंद, श्री योगेंद्र, स्वामी रामा, श्री अरोबिंदो, महर्षी महेश योगी, आचार्य रजनीश, बीकेएस अय्यंगार, स्वामी सत्यानंद सरस्वती यांचं मोठं योगदान आहे.

योगाचे प्रकार

भारतीय योग शास्त्रामध्ये पाच योग सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

ज्ञान योग - आत्मज्ञान,

हठ योग - आसन आणि कुंडलिनी जागृति

कर्म योग - योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)

भक्ति योग - भजनं कुर्याम्-भजन करावे.

राजयोग - योगः चित्तवृत्तिनिरोधः (चित्तातील वृत्तींवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)

योगासनांचे सर्वात मोठे दहा फायदे

वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात.

परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत.

सर्व स्तरांवर तंदुरुस्ती 

वजनात घट 

ताण तणावापासून मुक्ती

अंर्तयामी शांतता 

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

सजगतेत वाढ होते 

नाते संबंधात सुधारणा 

उर्जा शक्ती वाढते 

शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते 

अंतर्ज्ञानात वाढ 

किती देश आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करतात?

२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगही मनुष्याला दीर्घ आयुष्य देतं. पहिल्यांदा योग दिवस २१ जून २०१५ ला साजरा केला गेला. याची सुरूवाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेच्या भाषणात केली होती. ११ डिसेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्राच्या १७७ सदस्यांद्वारे २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याला मंजूरी मिळाली. 

एकत्र योगा करण्याचा रेकॉर्ड

एकाच वेळी एकत्र ३५ हजार ९८५ लोकांनी योग करण्याचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. त्यासोबतच सर्वाधिक ८४ देशातील लोकांनी एकत्र योग करण्याचाही रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. अशाप्रकारे भारतात एका दिवसात योगाशी संबंधित दोन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत.
 

 

Web Title: International Yoga Day 2021 : Yoga history, development and everything you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.