दिवसभरातून तुम्ही कितीवेळा श्वास घेता आणि सोडता? वाचा श्वसनाबाबत माहीत नसलेल्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 01:52 PM2020-08-31T13:52:02+5:302020-08-31T14:01:08+5:30

लॉकडाऊनमुळे सर्वचजण आपापल्या घरात बंद होते. त्याचा सकारात्मक परिणाम वातावरणात दिसून आला. आज आम्ही तुम्हाला श्वसनप्रक्रियेशी निगडीत काही माहिती सांगणार आहोत. 

Interesting facts about breath system, know all about breathing system | दिवसभरातून तुम्ही कितीवेळा श्वास घेता आणि सोडता? वाचा श्वसनाबाबत माहीत नसलेल्या गोष्टी

दिवसभरातून तुम्ही कितीवेळा श्वास घेता आणि सोडता? वाचा श्वसनाबाबत माहीत नसलेल्या गोष्टी

googlenewsNext

माणसांना जीवन जगण्यासाठी अन्न पाण्याइतकीच शुद्ध हवेचीही गरज असते. श्वास घेताना आपण ऑक्सिजन आत  घेतो.  त्यालाच प्राणवायू असं म्हटलं जातं. श्वास घेताना ऑक्सिजन  आत घेतला जातो आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडला जातो. शहरातील प्रदुषणानं भरलेल्या वातावरणात शुद्ध हवा मिळणं कठीण आहे. लॉकडाऊनमुळे सर्वचजण आपापल्या घरात बंद होते. त्याचा सकारात्मक परिणाम वातावरणात दिसून आला. आज आम्ही तुम्हाला श्वसनप्रक्रियेशी निगडीत काही माहिती सांगणार आहोत. 

श्वास घेण्याची प्रक्रिया सुरू असताना फुफ्फुसांचा फक्त २५ टक्के वापर केला जातो. अमेरिकन लंग्स एसोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार दोन्ही फुफ्फुसांचे वजन  ६५० ग्राम असते. २० ते २५ वर्ष वयात दोन्ही फुफ्फुसं परिपक्व होतात. ३५ वर्षानंतर फुफ्फुसांची कार्यक्षमता  हळूहळू कमी होऊ लागते. श्वसन प्रक्रियेदरम्यान जेव्हा आपण हवा आत घेतो तेव्हा २१ टक्के ऑक्सिजन आत घेतला जातो. शरीराला ५ टक्के ऑक्सिनजनची आवश्यकता असते. श्वास सोडताना बाकीची हवा बाहेर सोडली जाते. दर दहा वर्षाला  श्वास घेण्याची क्षमता एकूण ०.२ टक्क्यांनी कमी होते. 

श्वास घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो आणि शरीरातील रक्ताच्या संपर्कात येतो. यामुळे शरीरातील वेगवेगळे भाग निरोगी राहतात. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकदा श्वास घेताना फुफ्फुसं चार लीटरपर्यंत ऑक्सिजन आत घेऊन बाहेर सोडण्यासाठी सक्षम असतात. सामान्य व्यक्ती एका मिनिटात १५ वेळा श्वास घेतो. एका दिवसात २१६०० वेळा श्वास घेतला जातो. माणसांच्या तुलनेत प्राण्यांची श्वास घेण्याची गती जास्त असते. एक कुत्रा एका मिनिटात ६० वेळा श्वास घेतो.

हत्ती आणि कासव एका मिनिटात फक्त दोन ते तीनवेळा श्वास घेतात. श्वास घेताना शरीरात हवा भरली जाते. तणावरहीत श्वास घेतल्यास तितक्याच प्रभावीपणे दीर्घश्वास घेतला जाऊ शकतो. शरीरातील हाडं, मान इतर अवयव यामुळे कार्यान्वित होतात. श्वास घेण्याच्या योग्य पध्दतीने दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते. 

फुफ्फुसं चांगली ठेवण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करताना तोंड झाकून घ्या. फटाके उडवू नका. अ‍ॅलर्जीच्या रुग्णांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. सध्या ताप, सर्दी आणि खोकला असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यावर खबरदारी म्हणून लोकांनी भरपूर कोमट पाणी प्यावे. तसेच थंड पदार्थ आणि पेयांचे सेवन टाळावे.

हे पण वाचा-

मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा

coronavirus: मोदीस्टाईल गमचा नव्हे, मास्क करतो कोरोना विषाणूपासून संरक्षण

Web Title: Interesting facts about breath system, know all about breathing system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.