फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर; जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 01:03 PM2019-01-14T13:03:02+5:302019-01-14T13:06:30+5:30

वाढतं वायूप्रदुषण आणि धुम्रपानाची सवय यांमुळे लोकांमध्ये फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण वाढत चाललं आहे. याआधी फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये भारत आठव्या क्रमांकावर असून आता तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

India fourth rank in lung cancer do not ignore these symptoms | फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर; जाणून घ्या लक्षणं

फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर; जाणून घ्या लक्षणं

Next

वाढतं वायूप्रदुषण आणि धुम्रपानाची सवय यांमुळे लोकांमध्ये फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण वाढत चाललं आहे. याआधी फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये भारत आठव्या क्रमांकावर असून आता तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे, जवळपास 85 टक्के रूग्णांमध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजला पोहोचल्यामुळे या आजाराने मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. 

सजिर्कल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि संस्था संचालक डॉ. अजय मेहता यांनी ही माहीती दिली की, कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टीट्यूट (एचसीजी एनएचआरआय) आणि विदर्भ चेस्ट असोसिएशनच्या सहाय्याने रविवारी फुफ्फुसांच्या आजारांबाबत एक दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, फुफ्फुसामध्ये कॅन्सरच्या पेशी वाढल्याने फुफ्फुसांच्या कार्यामध्ये बाधा निर्माण होते. यामुळे शरीराला आवश्यक प्राणवायू मिळण्यास अनेक समस्या निर्माण होतात. खोकताना रक्त येणं, छातीमध्ये वेदना होणं, भूक कमी लागणं, वजन कमी होणं, सतत धाप लागणं आणि आवाज कमजोर होणं यांसारख्या कॅन्सरच्या लक्षणांचाही सामना करावा लागतो. 

धुम्रपान करणाऱ्यांसाठी वाढता धोका

डॉ. मेहता यांनी सांगितले की, फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये धुम्रपानाव्यतिरिक्त प्रदुषणामुळे मोठा धोका निर्माण होतो. या आजारामध्ये धुम्रपान करणाऱ्यांच्या 40 ते 45 वयादरम्यानच्या लोकांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचा वाढता धोका असल्याचे मानले जाते. फुफ्फुसांच्या कॅन्सरचे पहिल्या स्टेजमध्येच निदान झाल्यावर तत्काळ ऑपरेशन केल्यावर रूग्णाचा जीव वाचण्याची शक्यता 80 ते 85 टक्के असते. या आजाराचे निदान करण्यासाठी संस्थेमध्ये लवकरच 'डोज कॉम्प्यूटेड टोमोग्राफी' या तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे.
 
फुफ्फुसांच्या आजारामुळे भारतामध्ये सर्वात जास्त मृत्यू

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)च्या रिपोर्टनुसार, जगभरामध्ये फुफ्फुसांच्या आजारामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. कॅन्सरच्या शंभर रूग्णांपैकी 13 रूग्ण हे कॅन्सरने ग्रस्त आहेत. भारतात प्रत्येकवर्षी फुफ्फुसाच्या कॅन्सरने 70 हजार पेक्षाही अधिक रूग्ण आढळून येतात. यामुळे 60 हजार पेक्षा अधिक रूग्णांचा या आजारामुळे मृत्यू होतो. महाराष्ट्रामध्येही याचे प्रमाण अधिक असून विदर्भातही अनेक रूग्णांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं दिसून आली आहेत. विदर्भामध्ये असलेल्या वीजनिर्मितीच्या प्रकल्पांमुळे या परिसरामध्ये श्वसनाच्या आजारामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. 

तंबाखूवर बंदी का नाही?

फरीदाबादमधील सर्वोदय हॉस्पिटलच्या डॉ. दिनेश पेंढारकर यांनी सांगितले की, तंबाखूमुळे कॅन्सर होण्याचा धोका 40 टक्क्यांनी वाढतो. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध जाहिरातींमार्फत लोकांना तंबाखूपासून दूर राहण्यासाठी आवाहन करण्यात येते. यानंतरही तंबाखूच्या सवयीवर कोणत्याही प्रकारचा निर्बंध घालण्यात आलेले नाही. संपूर्ण जगभरामध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर असून कॅन्सरच्या रूग्णांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. 

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :

- जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळी जर शिटीसारखा आवाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आवाजामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरप्रमाणेच इतरही आजारांचा धोका असतो. 

- जर तुम्हाला खोल किंवा लांब श्वास घेताना त्रास होत असेल तर हे फुफ्फुसांमध्ये घम जमा असण्याचं कारण असू शकतं. ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. 

- चेहरा आणि घश्यामध्ये सूज असणंही लंग कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर अचानक घसा किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

- कॅन्सर वाढल्याने सांधेदुखी, पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास होतो. अनेकदा हाडं फ्रॅक्चरही होतात. 

- जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबतच पाठ आणि खांदेदुखीचाही त्रास सतावत असेल तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. 

- कफ झाला असेल आणि खूप औषधं घेऊनही तो बरा होत नसेल. तर हे संक्रमण असू शकतं. याव्यतिरिक्त कफ संबंधातील इतर समस्या म्हणजे थुंकीतून रक्त पडतं असेल तर वेळीच तपासणी करून घ्या. 

- फुफ्फुसांच्या कॅन्सरचा परिमाण मेंदूवरही होतो. अशा परिस्थितीमध्ये जर सतत डोकेदुखीचा त्रास सतावतो. 

- अनेकदा शरीरातील कॅल्शिअमची मात्रा अधिक होते. ज्यामुळे रक्त गोठण्यास सुरुवात होते. हे देखील लंग कॅन्सर होण्याचं एक कारण असू शकतं. 

Web Title: India fourth rank in lung cancer do not ignore these symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.