दररोज जर 'हे' काम कराल, तुम्ही कधीच काही नाही विसराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 10:56 AM2019-05-31T10:56:09+5:302019-05-31T10:59:58+5:30

आजकाल अनेकांना मेमरी लॉस म्हणजेच स्मरणशक्ती कमी झाल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

Increase memory so do everyday 30 minutes exercise | दररोज जर 'हे' काम कराल, तुम्ही कधीच काही नाही विसराल!

दररोज जर 'हे' काम कराल, तुम्ही कधीच काही नाही विसराल!

Next

(Image Credit : jamalong.org)

आजकाल अनेकांना मेमरी लॉस म्हणजेच स्मरणशक्ती कमी झाल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. तज्ज्ञ मानतात की, याचं कारण ओव्हर बर्डन आणि बिझी शेड्यूल आहे. जे लोक जेवढे जास्त व्यस्त असतात, त्यांची मेमरी तेवढी जास्त कमजोर असते. यासाठी दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायामाचा सल्ला दिला जातो. चला जाणून स्मरणशक्ती वाढण्यास व्यायाम कसा फायदेशीर ठरतो. 

मेंदूच्या कार्याची क्षमता वाढवतो

(Image Credit : www.self.com)

सामान्य लोक रोज काहीना काही कारण सांगून व्यायाम टाळतात. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे की, केवळ ३० मिनिटे व्यायाम करून तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकता. यासोबतच मेंदूची काम करण्याची पद्धतही बदलली जाऊ शकते. त्यामुळे डॉक्टर नियमितपणे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. साधारण अडीच तास सोप्या हालचाली जसे की, वेगाने चालणे किंवा गार्डनमध्ये स्वच्छता केल्याने वृद्ध वयस्कांचा मेंदू आणि शरीर निरोगी राहतं. 

असा केला गेला शोध

(Image Credit : Unicity Eldercare)

न्यू यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडच्या संशोधकांनी व्यायामाचा स्मरणशक्तीवर प्रभाव जाणून घेण्यासाठी ५० ते ५८ वयोगटातील जवळपास २६ वयस्कांवर अभ्यास करण्यात आला. रिसर्चमध्ये आढळलं की, केवळ तीस मिनिटांचा व्यायाम स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूचं कार्य वाढवतो. याने कोणताही गोष्ट चांगल्याप्रकारे लक्षात ठेवण्यासाठी मदत मिळते.

मेमरीवर होतो वयाचा प्रभाव

(Image Credit : Complete Neurological Care)

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रिव्हेंशननुसार, ६० पेक्षा अधिक वयाच्या १३ टक्के लोक जेव्हा काही आठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना काहीही आठवत नाही. असं त्यांच्यासोबत अनेकदा झालं आहे. सेंटरनुसार, लोकांमध्ये अल्झायमरचा धोका वेगाने वाढत आहे. ६० ते ७० वयादरम्यान डोक्याच्या काही भाग आणि हिप्पोकॅम्पस आकुंचित होऊ लागतो, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते.

व्यायाम मेमरीसाठी फायदेशीर

(Image Credit : Runner's World)

अभ्यासकांचं म्हणणं आहे की, वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या आठवणी तयार होतात. त्यांचं आपलंच एक महत्त्व असतं. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे व्यायाम ही आहे. शारीरिक हालचाल मेंदूवर सकारात्मक प्रभाव टाकते. हार्वर्ड हेल्थ ब्लॉगनुसार,  नियमित व्यायामाने मेंदूच्या पेशींवर सुरक्षात्मक प्रभाव पडतो. याने विचार करण्याची क्षमताही विकसित होते.

Web Title: Increase memory so do everyday 30 minutes exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.