सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:07 IST2025-07-24T11:06:52+5:302025-07-24T11:07:13+5:30
अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त हानिकारक आहे. ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा मोठा धोका असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
विविध सण, उत्सवाची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. श्रावणात नागपंचमीनंतर एकामागून एक सण येतात. प्रत्येक घरात धार्मिक विधींमध्ये अगरबत्तीचा वापर हा हमखास केला जातो. अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करतो, आनंद देतो. पण त्यातून येणारा धूर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. एका रिसर्चमधून हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त हानिकारक आहे. ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा मोठा धोका असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
रिसर्चमध्ये सिगारेट आणि अगरबत्तीच्या धुरामुळे होणाऱ्या नुकसानाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. याच दरम्यान अगरबत्तीच्या धुराच्या नमुन्यात ९९ टक्के अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म कण आढळले. या गोष्टी शरीराला नुकसान पोहोचवतात. साउथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि चायना टोबॅको ग्वांगडोंग इंडस रेल्वे कंपनीने संयुक्तपणे हा रिसर्च केला आहे.
अगरबत्तीच्या धुरावर करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार, अगरबत्ती जाळल्यानंतर धुरासोबत काही सूक्ष्म कण देखील बाहेर पडतात. हे कण हवेत मिसळतात. अगरबत्तींमधून बाहेर पडणाऱ्या विषारी कणांचा शरीराच्या पेशींवर अत्यंत वाईट परिणाम होतो.
कॅन्सरचा धोका
धुरामध्ये तीन प्रकारचे विशेष पदार्थ असतात ज्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो. हे विषारी पदार्थ म्युटेजेनिक, जीनोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक म्हणून ओळखले जातात. अगरबत्तींमधून निघणारा धूर आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांमध्ये जळजळ, जळजळ आणि विविध प्रकारचे आजार होतात. अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनमार्गात जळजळ देखील होऊ शकते.
डोळ्यांसाठी घातक
अगरबत्तीच्या धुरात असलेल्या हानिकारक केमिकल्समुळे डोळ्यांमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचेची ऍलर्जी यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. या धुरामुळे दृष्टी कमी होण्याचा धोका देखील असतो.