उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने हैराण आहात? लगेच करा 'हे' उपाय, मग बघा कमाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 01:26 PM2024-03-30T13:26:16+5:302024-03-30T13:30:56+5:30

उन्हाळ्यात आपल्यापैंकी बरेच जण हे घामामुळे त्रस्त असतात तर काही घामाच्या दुर्गंधीने त्रस्त असतात.

in summer season how get rid of body smell of sweat know about some tips | उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने हैराण आहात? लगेच करा 'हे' उपाय, मग बघा कमाल....

उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने हैराण आहात? लगेच करा 'हे' उपाय, मग बघा कमाल....

Health Tips : उन्हाळा आला की लोक घामाच्या धारांनी अक्षरश: न्हाऊन निघतात. काही जणांना तर इतरांपेक्षा जास्त घाम येतो. या सीझनमध्ये घामाचा त्रास हा प्रत्येकाला होतो.  उन्हाळ्यात आपल्यापैंकी बरेच जण हे घामामुळे त्रस्त असतात तर काही घामाच्या दुर्गंधीने त्रस्त असतात. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असताना आपल्या शरीरातून घामाचा वास आला की आपल्याला स्वत:चीच लाज वाटू लागते. त्यामुळे लोक चार-चौघांत बोलताना लोक घाबरतात. पण आज आम्ही तुम्हाला घामाच्या दुर्गंधापासून सूटका कशी मिळवायची याबद्दल सांगणार आहोत.

शरीरातून घामाचा वास आला की काही लोकांना त्याची लाज वाटते. उन्हाळ्यात शरीराला घाम येणं सहाजिक आहे, पण त्याचा दुर्गंध आला तर ते तुम्हाला आणि इतरांनाही त्रासदायक ठरतं. त्यामुळे महागडे परफ्यूम्स, डिओड्रेंट वापरण्यास अनेकजण पसंती देतात. तरी देखील घामाची समस्या काही पिच्छा सोडत नाही. जर घामाचा वास येत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटकारा मिळू शकता. 

लिंबु ठरतो फायदेशीर- 

शरीरामध्ये उष्णता वाढली की त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो. त्यासाठी दिवसांतून किमान दोनदा आंघोळ करणं उत्तम आहे. शिवाय आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस किंवा त्याच्या पानांची पावडर आंघोळीच्या पाण्यात मिसळा. असं केल्याने शरीरातून येणाऱ्या घामाची दुर्गंधी दूर होते, असं तज्ञ सांगतात.

कडुलिंबाने घामाच्या वासापासून सुटका मिळण्याबरोबरच बॅक्टेरियादेखील नष्ट होतात. यासाठी कडुलिंब पाण्यात टाकुन पाणी गरम करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा, यामुळे घामाचा वास येणे थांबते. 

बेकिंग सोडा- 

बेकिंग सोड्यामध्ये घाम शोषून घेण्याची ताकद असते. त्यामधील या गुणधर्मांमुळे घामाच्या दूर्गंधीपासून सुटका मिळवता येते. या बेकिंग सोड्याचा टॅल्कम पावडर प्रमाणे उपयोग करावा. सोडा काखेत लावावा. थोड्या वेळ तो तसाच राहू द्यावा. नंतर कोरड्या रुमालानं झटकून टाकावा.

पुदीना-

पुदीनाचा पाने शरीरासाठी फ्रेशनरचं काम करतात. पुदीनाची पाने पाण्यात मिसळून ते पाणी गरम करून घ्यावं. हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा, याने अंघोळ केल्याने आपल्याला फ्रेश वाटेल आणि घामाच्या वासापासूनही सुटका मिळेल. 

बेसन -

जर शरीरातून घामाचा वास जास्तच येत असेल तर बेसनमध्ये दही मिक्स करून शरीरावर लावा आणि थंड पाण्याने अंघोळ कराली. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. 

शॉवर जेलही ठरतील उपयुक्त-

हल्ली बाजारात शॉवर जेल किंवा बॉडी शॅम्पू देखील सहज मिळतात. त्याचा वापर केल्याने घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळू शकते. त्याच्या वापराने तुम्हाला ताजेतवाने देखील वाटेल.

Web Title: in summer season how get rid of body smell of sweat know about some tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.