Immunity boosters side effects disadvantages of kadha turmeric milk and lemon water kadha | इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोज 'या' ३ गोष्टी वापरत असाल; तर वेळीच सावध व्हा

इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोज 'या' ३ गोष्टी वापरत असाल; तर वेळीच सावध व्हा

हिवाळ्याच्या दिवसात कोरोनासारख्या इतर व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली  राहणं गरजेचं असतं. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करत आहेत. बहुतेक लोक रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध, लिंबू पाणी, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत आहेत. अशा पदार्थाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्तीवर सकारात्मक परिणाम होत असला तरी जास्त प्रमाणात या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला धोका उद्भवू  शकतो. म्हणूनच आम्ही या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत माहिती देणार आहोत.

काढा

काढ्याचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते. काढ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्तीला मजबूत करता येऊ शकतं. पण जास्त प्रमाणात काढ्याचे सेवन केल्यास शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढून इतर समस्या उद्भवण्याचा धोका असतो.  काढा सतत प्यायल्याने पोटाच्या तसंच त्वचेच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. आधीच कोरोनाची भीती त्यात इतर आजारपणांमुळे शारीरिक स्थिती खराब होऊ शकते. म्हणून कोणताही घरगुती उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रोज काढ्याचे सेवन करू नये. एक दिवसाआड काढा प्यायला हवा. जर तुम्ही रोज काढा पीत असाल तर आजचं ही सवय पूर्णपणे बंद करा. आठवड्यातून  दोन किंवा तीन वेळा काढ्याचे सेवन करणं उत्तम ठरेल. 

काढ़ा पीना स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है- सांकेतिक तस्वीर

हळदीचं दूध

हळदीत आणि दूधात  रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे गुण असतात. अनेक पोषक घटक असल्यामुळे हळदीच्या दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यातील एंटीवायरल आणि एंटीबॅक्टेरिअल गुणांमुळे आजाराशी सामना करण्यास मदत होते. हळदीच्या दुधाला सुपर ड्रिंक असंही म्हटलं जातं.  काही स्थितीत हळदीच्या दुधाचं सेवन करणं आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारं ठरू शकतं.

अनेकांना छातीत कफ जमा होण्याची समस्या उद्भवते. शरीरातील कफ बाहेर पडत नसतील तर अशा स्थितीत हळदीच्या दुधाचं सेवन करू नये. हळदीचं दूध प्यायाल्यानं कफ छातीत जमा राहतो. हळदीमुळे कफ सुकतात. तरीही तुम्हाला प्यावसं वाटत असेल तर गरम दूधात हळदीची पावडर घालून मग त्यांचे सेवन करा. 
श्वास घ्यायला त्रास होत असेल तर रात्री झोपताना हळदीच्या दूधाचे सेवन करू नये.

काळजी वाढली! कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

हळदीतल्या गुणधर्मांमुळे श्वसनप्रणाली अतिसक्रिय होऊन श्वास घेण्यासाठी होत असलेला त्रास वाढण्याची शक्यता असते.  म्हणून तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा पंपाचा वापर करत असाल तर हळदीच्या दुधाचं सेवन करू नका. कोणत्याही व्यक्तीसाठी हळदीचे सेवन २० ते ४० mg पुरेसं असतं. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीराला गरम पडण्याची शक्यता असते. 

Coronavirus: खुशखबर! फेब्रुवारीपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार; दोन डोसची किंमत असणार फक्त...

जास्तीत जास्त लोक कुटलेली हळद दूधामध्ये एकत्र करून त्याचं सेवन करतात. दरम्यान, हळदीच्या पावडर ऐवजी हळकुंड जास्त इफेक्टिव्ह असतं. तुम्ही एखादं हळकुंड घेऊन ते वाटून घ्या. त्याचबरोबर काळी मिरीची पावडर करून एकत्र करा. आता एक कप दूध एकत्र करून त्यामध्ये कुटलेली हळद आणि मिरी पावडर एकत्र करा. 20 मिनिटांपर्यंत उकळल्यानंतर गाळून घ्या त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करून प्या. 

तुम्हाला डायबिटीस असेल तर मुलांना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

लिंबू पाणी

लिंबू पाणी  आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. लिंबात व्हिटामीन सी मोठया प्रमाणात असते. त्यामुळे  रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते. वजन कमी होतं असे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही दोन लिंबांचा रस करून पीत असाल तर अधिक प्रमाणात लिंबू शरीरात गेल्याने शारीरिक समस्या उद्भवू शकतात.  ज्या लोकांना पोटाच्या, आतड्यांच्या समस्या असतात किंवा अतिरिक्त ताण तणाव घेण्याची सवय असते. त्यांनी लिंबू पाण्याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Immunity boosters side effects disadvantages of kadha turmeric milk and lemon water kadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.