तुम्हाला डायबिटीस असेल तर मुलांना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 04:10 PM2020-11-19T16:10:23+5:302020-11-19T16:14:28+5:30

Health tips in Marathi : अनियमित जीवनशैलीमुळे उद्भवत असलेला डायबिटीस हा टाईप २ असतो. काहीवर्षांपूर्वी लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त टाईप १ डायबिटीसचे प्रमाण जास्त होते.

Type 2 diabetes in children know risks causes and tips for prevention of diabetes in kids | तुम्हाला डायबिटीस असेल तर मुलांना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

तुम्हाला डायबिटीस असेल तर मुलांना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

googlenewsNext

डायबिटीसचा आजार सुरूवातीला सौम्य लक्षणांपासून सुरू होतो. हळूहळू या लक्षणांचे गंभीर आजारात रूपांतर होते. डायबिटीसमुळे किडनी, हृदय, फुफ्फुसं, डोळे, यकृत या अवयवांवर परिणाम होतो. ऑस्ट्रेलियन डायबिटीज एज्युकेटर एसोसिएशनकडून मान्यता प्राप्त डायबिटीज विशेषज्ञ आणि डायटीशियन स्वाती बाथवाल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमच्या लहान मुलांना डायबिटीस होण्यापासून कसं वाचवता येईल याबाबत अधिक माहिती दिली आहे.

लहान मुलांना डायबिटीस होण्याची शक्यता कितपत असते?

तुमचा विश्वास बसणार नाही पण इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्यामते २०१९ मध्ये जगभरातील डायबिटीजच्या रुग्णांचा आकडा जवळपास ४६.६ कोटी होता. म्हणजेच जगभरातील एकूण ९ टक्के लोकसंख्या डायबिटीसच्या आजाराने पिडित होती. यात लहान मुलांचाही समावेश आहे. डायबिटीस साधारणपणे जीवनशैलीशी निगडीत एक आजार आहे. म्हणजेच आई वडिलांना हा आजार असेल तर लहान मुलांनाही होऊ शकतो. 

अनुवांशिक डायबिटीसला टाईप १ डायबिटीस म्हणतात. तसंच अनियमित जीवनशैलीमुळे उद्भवत असलेला डायबिटीस हा टाईप २ असतो. काहीवर्षांपूर्वी लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त टाईप १ डायबिटीसचे प्रमाण जास्त होते. जीवनशैलीतील बदलांमुळे आता मुलांना टाईप २ डायबिटीसचा धोका निर्माण झाला आहे. स्वाती बाथवाल यांनी टाईप २ डायबिटीसला रोखण्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

आहारात अनियमितता

लहान मुलांना गोड खायला जास्त आवडतं. सध्याच्या लहान मुलांच्या आहारात गोड आणि प्रोसेस फूडचा समावेश असतो. ज्यात जराही पोषक तत्व नसतात. तुलनेने साखर आणि कार्ब्सचे प्रमाण जास्त असते.  हाय फ्रूक्टोज कॉर्न सिरपचा वापर केला जातो. या दोन्ही गोष्टी जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास नुकसानकारक ठरते. तसंच जास्त तेलकट  खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढतो. 

जीवनशैली

सध्या लहान मुलं मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाईलवर तासनतास व्यस्त असतात. त्यामुळे  कोवळ्या उन्हात किंवा मैदानात जाऊन  खेळण्याची सवय नसते. परिणामी शरीराला योग्य प्रमाणात व्हिटामीन डी मिळत नाही. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपमध्ये बघत मुलं दिवसभर बसलेले असतात. त्यामुळे  पोषक घटकांच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, एकाग्रता कमी होणं, डायबिटीससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट इत्यादी गॅझेट्समधून बाहेर येत असलेले ब्लू लाईट  झोपेसाठी कारणीभूत ठरणारं हार्मोन मेलिटोनिनची पातळी कमी करते.  ज्यामुळे रात्री व्यवस्थित झोप येत नाही. झोप न येण्याच्या समस्येमुळे डायबिटीसचा सामना करावा लागतो. याचा परिणाम इन्सुलिन हार्मोनवर होतो. काळजी वाढली! कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

लहान मुलांना या आजारापासून वाचवण्यासाठी बाहेरच्या पॅक्ड् पदार्थांपेक्षा  खजूर, गुळ, काजू, मध, मनुके  असे पदार्थ खायला द्यायला हवेत जेणेकरून मुलांमध्ये पोषक घटकांची कमतरता भासणार नाही. सतत वजन वाढणं, लठ्ठपणाचा सामना करावा लागणं, तहान लागणं, लघवीला येणं, जास्त भूक लागणं ही लहान मुलांमध्ये डायबिटीस असल्याची लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्या. फायजर पाठोपाठ सिनोवॅक कंपनीची लस ठरतेय प्रभावी; २८ दिवसात एंटीबॉडीज विकसित होण्याचा तज्ज्ञांचा दावा

Web Title: Type 2 diabetes in children know risks causes and tips for prevention of diabetes in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.