हृदयरोगापासून टेन्शनपर्यंतच्या समस्यांची माहिती मिळणार; 'ही' गादी आजाराचे संकेत देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:14 AM2019-09-24T10:14:19+5:302019-09-24T10:23:23+5:30

आजच्या धावपळीच्या जगात बदलती लाईफस्टाईल, कामाचा ताण यामुळे जगभरातील लोकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

IIT graduates develop sheet that can detect heart disorders as you sleep | हृदयरोगापासून टेन्शनपर्यंतच्या समस्यांची माहिती मिळणार; 'ही' गादी आजाराचे संकेत देणार

हृदयरोगापासून टेन्शनपर्यंतच्या समस्यांची माहिती मिळणार; 'ही' गादी आजाराचे संकेत देणार

Next
ठळक मुद्देआर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर आधारित एक सेन्सर शीट तयार करण्यात आली आहे. श्वसन आणि घोरण्याबाबतच्या समस्यांचेही निदान होऊ शकते.झोपताना शीट गादीखाली ठेवल्यास आजारांची लक्षणे समजण्यास मदत

नवी दिल्ली - आजच्या धावपळीच्या जगात बदलती लाईफस्टाईल, कामाचा ताण यामुळे जगभरातील लोकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. निरोगी आरोग्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते. झोपेतच आजारांचे निदान होईल किंवा डॉक्टर्स नाही तर एखादी गादी तुम्हाला तुमच्या आरोग्याची माहिती देणार असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. आयआयटी पदवीधरांनी हृदयरोग, श्वसन, झोप आणि तणावाबाबतचे निदान करणारी एक शीट तयार केली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (Artificial Intelligence) वर आधारित एक सेन्सर शीट तयार करण्यात आली आहे. झोपताना शीट गादीखाली ठेवल्यास आजारांची लक्षणे समजण्यास मदत करण्याचं काम ही सेन्सर शीट करणार आहे. 'बॅलिस्टोकार्डिओलॉजी'  (Ballisto cardio graphy) या तंत्रज्ञानाने हे उपकरण काम करते. यामुळे श्वसन आणि घोरण्याबाबतच्या समस्यांचेही निदान होऊ शकते. आयआयटी मुंबई येथून शिक्षण घेतलेल्या मुदित दंडवते यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला आहे. यामुळे हृदयाचे ठोके आणि श्वसनाचे 98.4 टक्के अचूक मोजमाप होऊ शकते.' 

सेन्सर शीटची किंमत 7200 रुपये आहे. आयआयटीमधून शिक्षण घेतलेले गौरव परचानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्याचा डेटा संकलित करतं त्यामुळे आजाराचे वेळेत निदान होऊ शकते. तापापासून हृदय निकामी होण्यापर्यंतच्या सर्व आजारांची लक्षणे दिसण्यापूर्वीच या उपकरणाने यशस्वीपणे निदान केलेले आहे. सेन्सर शीट ही फोनसोबत कनेक्ट असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अलोग्रिथम द्वारा बायोमार्करमध्ये परिवर्तित केलं जाईल. त्यानंतर क्लाउड सर्व्हरच्या मदतीने युजर्स आणि त्यांची देखभाल करणाऱ्या व्यक्ती तसेच डॉक्टरलाही ही माहिती मोबाईल फोन अ‍ॅप आणि वेब अ‍ॅपच्या मदतीने दिली जाणार आहे. 

तुमच्या आहारात असू शकतं तुम्हाला रात्री झोप न येण्याचं कारण!

दिवसभराच्या थकव्यानंतर तर रात्री लगेच झोप यायला हवी. पण थकव्यानंतरही तुम्हाला झोप येत नसेल याचं कारण तुमच्या आहारात असू शकतं. म्हणजे तुमच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असू शकते. तुमच्या आहारात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करून तुम्ही गंभीर समस्या दूर करू शकता. पोषक तत्त्वांची कमतरता असेल तर याचा प्रभाव तुमच्या झोपेवरही पडतो. तुम्हाला झोप न येण्याचं कारण तुमच्यात पोषक तत्त्वांची कमरता हे असू शकतं. एका नव्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. तसेच या रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये झोपेसाठी जास्त पोषक तत्त्वे जबाबदार आहेत. पण ही कमतरता त्या डायटरी सप्लिमेंट्स घेऊनही भरून काढू शकतात. 

 

Web Title: IIT graduates develop sheet that can detect heart disorders as you sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.