तुमच्या आहारात असू शकतं तुम्हाला रात्री झोप न येण्याचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 10:49 AM2019-06-11T10:49:24+5:302019-06-11T10:53:40+5:30

अनेकांना रात्री चांगली झोप न येण्याची समस्या असते. ते कितीही प्रयत्न करत असतील तरी सुद्धा त्यांना रात्री चांगली झोप लागत नाही.

Poor nutrients associated with poor sleep | तुमच्या आहारात असू शकतं तुम्हाला रात्री झोप न येण्याचं कारण!

तुमच्या आहारात असू शकतं तुम्हाला रात्री झोप न येण्याचं कारण!

(Image Credit : naturesown.com.au)

अनेकांना रात्री चांगली झोप न येण्याची समस्या असते. ते कितीही प्रयत्न करत असतील तरी सुद्धा त्यांना रात्री चांगली झोप लागत नाही. दिवसभराच्या थकव्यानंतर तर रात्री लगेच झोप यायला हवी. पण थकव्यानंतरही तुम्हाला झोप येत नसेल याचं कारण तुमच्या आहारात असू शकतं. म्हणजे तुमच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असू शकते. तुमच्या आहारात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करून तुम्ही गंभीर समस्या दूर करू शकता.

(Image Credit : aeroflowinc.com)

पोषक तत्त्वांची कमतरता असेल तर याचा प्रभाव तुमच्या झोपेवरही पडतो. तुम्हाला झोप न येण्याचं कारण तुमच्यात पोषक तत्त्वांची कमरता हे असू शकतं. एका नव्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. तसेच या रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये झोपेसाठी जास्त पोषक तत्त्वे जबाबदार आहेत. पण ही कमतरता त्या डायटरी सप्लिमेंट्स घेऊनही भरून काढू शकतात. 

रिसर्चचे अभ्यासक Chioma Ikonte यांनी सांगितले की, रिसर्चमधून हे समजून आलं की, तुम्ही तुमच्या आहारातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करून तुम्हाला झोप न येण्याची समस्या दूर करू शकता. पोषक तत्वांचा संबंध तुमच्या झोपेच्या तासांसोबतच चांगली झोप न येणे आणि जागे राहण्याच्या समस्येसोबतही आहे. आपल्या शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरलची गरज असते, पण ते आपल्या शरीरात तयार होत नाहीत. त्यामुळे ते आहाराच्या माध्यमातून घ्यावे लागतात. 

(Image Credit : Nutrition Review)

याआधीही करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्सचा संबंध इतर आजारांशी असल्याचं समोर आलं आहे. हे शरीराचा विकास, आरोग्य, सामान्य क्रिया आणि इम्यूनिटीशी संबंधित आहेत. 

Web Title: Poor nutrients associated with poor sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.