जेवण झाल्यावर लगेच 'या' गोष्टी करणं पडू शकतं महागात, तुम्हीही हे करता का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:02 IST2019-10-05T09:51:37+5:302019-10-05T10:02:11+5:30
आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात.

जेवण झाल्यावर लगेच 'या' गोष्टी करणं पडू शकतं महागात, तुम्हीही हे करता का?
(Image Credit : bestofme.in)
आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात. पण या महत्वाच्या गोष्टींची वेळ चुकली तर या उलट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. वेगवेगळे आजार लगेच आपल्याला त्यांच्या जाळ्यात घेऊ लागतात. मग हजारो आणि लाखो रूपये हॉस्पिटलमध्ये खर्च करत बसावे लागतात. आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर खाण्या-पिण्यापासून दिवसातील सर्वच महत्वाच्या गोष्टी वेळेवर केल्या गेल्या पाहिजे. खासकरून जेवणानंतर लगेच काय करू नये याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील.
लगेच झोपू नका
अनेक लोक असे असतात ज्यांना जेवण केल्या-केल्या आळस येऊ लागतो आणि ते लगेच झोपतात. पण असं करणं फार नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्याने तुमच्यात लठ्ठपणा वाढू शकतो आणि तुम्हाला पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.
लगेच फळं खाऊ नका
असे मानले जाते की, जेवण केल्यावर फळं खावीत. पण जेवण केल्यावर लगेच फळं खाणं योग्य ठरत नाही. आयुर्वेदानुसार असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच फळं खाल्ल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडा वेळ गेल्यानंतर फळं खावीत, लगेच खाऊ नयेत.
आंघोळ करू नका
तुम्हाला हे माहीत आहेच की, निरोगी शरीरासाठी वेळेवर आंघोळ करणे आणि जेवण करणे फार गरजेचं असतं. अनेक असेही लोक असतात जे जेवण केल्यानंतरच आंघोळ करतात. पण याने त्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कारण जेवण केल्यानंतर आपल्या पोटात रक्ताचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपली पचनक्रिया हळू होते. अर्थात याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.
चहा घेऊ नका
काही लोक चहाचे फारच शौकीन असतात. त्यांना चहाची सवय लागलेली असते. मग हे लोक जेवण झाल्यावर लगेच चह घेतात. पण जेवण झाल्यावर लगेच चहा घेतल्याने पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला अॅसिडीटीची समस्याही होऊ शकते.
स्मोकिंग करू नका
आपल्याजवळ असे अनेक लोक असतात जे जेवण केल्यानंतर लगेच स्मोकिंग करतात. असं करणं आरोग्यासाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.
लगेच फिरू नका
असे मानले जाते की, जेवण केल्यावर थोडी शतपावली केल्याने अन्न चांगलं पचतं. आयुर्वेदानुसार, असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच चालू नये. थोडावेळ थांबून चालायला हवं. जर लगेच चालायला लागाल तर शरीराला योग्य पोषण मिळत नाही. आणि आपली पचनक्रियाही कमजोर होते.