शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

चालाल तर वाचाल, रोज तीन मिनिटं चालण्याचे 'असे' फायदे जे तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 20:51 IST

चालण्याचा व्यायाम स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करतो आणि चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे.

चालणं ही एक शारीरिक क्रिया आहे. आणि याचे बरेच फायदे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी ठरवून चालता तेव्हा चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. चालण्याचा व्यायाम स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करतो आणि चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे.

उर्जावान वाटतेकाही काळ पायी चालण्याने तुम्ही उर्जेला चालना देऊ शकता. चालण्यामुळे, शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे नॉरेपाइनफ्रिन आणि एपिनेफ्रिन यांसारख्या हार्मोन्सची पातळी वाढते.

मसल्स आणि जॉइंट्स मजबूत होतातनियमित चालण्यामुळे शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी मिळते. गुडघे तसंत कंबरेच्या स्नायूंना बळकट करण्यासोबतच सांधेही मजबूत करण्यासाठी काम करतं. सपाट पृष्ठभागावर चालण्याऐवजी, किंचित उंच भागात चालणं फायदेशीर ठरेल.

हृदयाचं आरोग्य वाढतेपायी चालण्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम तर राहतेच पण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोकाही कमी होतो. यासाठी, आठवड्यातून ५ दिवस कमीत कमी ३० मिनिटं चालणं आवश्यक आहे. तुम्हाला ही क्रिया नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे.

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदतआपल्याला नेहमी सल्ला देण्यात येतो की जेवण झाल्यावर झोपू नये. त्याऐवजी काही वेळ चाललं पाहिजे. खाल्ल्यानंतर पायी चालण्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. हा एक चांगला व्यायाम आहे आणि जो आपण आपल्या दैनंदिन कामात तुम्ही समाविष्ट करू शकता.

कॅलरी बर्न होतातकॅलरी बर्न करण्यासाठी केवळ हेवी वर्कआउट्स आणि व्यायाम करावाच लागतो असं नाही. ते केल तर उत्तमच पण तुम्ही चालण्यानेही कॅलरी बर्न करू शकता. किती वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही किती वेगाने तसचं किती दिवस चालत आहात यावर अवलंबून आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स