१० किलो वजन कमी कराल तर 'या' आजारांपासून दूर रहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:53 AM2020-01-07T09:53:19+5:302020-01-07T10:06:15+5:30

कोणताही ऋतू असला तरी वजन वाढण्याची समस्या जाणवते.

If you lose 10kg you will be prevent from disease | १० किलो वजन कमी कराल तर 'या' आजारांपासून दूर रहाल

१० किलो वजन कमी कराल तर 'या' आजारांपासून दूर रहाल

Next

कोणताही ऋतू असला तरी वजन वाढण्याची समस्या जाणवते. जास्त वजन वाढल्यानंतर ते कमी करणं त्रासदायक ठरतं. त्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्ही करत असता. पण लठ्ठपणातून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळत असतं. त्यात अनेक गंभीर स्वरुपाच्या आजारांचा सुद्धा समावेश असतो.  कॅन्सर, मधुमेह, पोटाचे विकार असे आजार उद्भवतात. तज्ञांच्यामते जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही  १० किलो वजन कमी करून आजारांपासून वाचू शकता.  

वजन कमी केल्यास तुम्हाला धोकादायक आजारांपासून लांब राहता येत. एसोसिएशन ऑफ फिजीशियन ऑफ इंडिया (एपीआई) च्या चार दिवसांच्या  एपिकॉन-2020 मध्ये हे स्पष्ट करण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती. 

या तज्ञांनी केलेल्या अभ्यासावर आधारित एक माहीती स्पष्ट केली. त्या त ६० ते ७० टक्के  लोकांचे वजन हे जास्त आहे.  अशा लोकांनी आपलं वजन जर १०किलोंनी कमी केलं तर त्यांना आजारांपासून दूर राहता येऊ शकतं. या पध्दतीचा अवलंब केल्यास  कोणतेही औषध न घेता डायबिटीसवर नियंत्रण मिळवता येते. सर्वाधिक लोकं हे मैदा, मीठ आणि साखरेचा जास्त वापर करत असल्यामुळे त्याच्या आरोग्याला नुकसान पोहोचत आहे. 

या गोष्टींचा सर्वाधीक वापर जीवघेणा सुद्धा ठरू शकतो.  त्यांच्या म्हणण्यानुार तुम्ही चाळीस वर्षाचे झाल्यानंतर चाचणी करणं गरजेचं आहे. तसंच ही वैद्यकीय चाचणी  तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे.  अनेक रुग्णांच्या औषधाचा त्यांच्या किडनीवर प्रभाव पडत असतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो पुरेश झोप घेणे. 

वजन कमी करण्यासाठी किमान ७ तासांची झोप महत्वाची आहे. वजन कमी करण्यावर झोपण्याची वेळ आणि पद्धत याचाही प्रभाव पडत असतो. प्रयत्न करा की, रोज रात्री झोपण्याची तुमची वेळ एकच असावी.

जास्तीत जास्त लोकांमध्ये लठ्ठपणाचं कारण हे त्यांचं रात्री उशीरा जेवण करणं असतं. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर रात्री जास्त उशीरा जेवण करू नका. असं केल्यास तुमचं वजन जलद गतीने  कमी होईल आणि आजारांपासून लांब राहता येईल.

Web Title: If you lose 10kg you will be prevent from disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.