तुमची नखं देतात 'या' विशिष्ट दुर्मिळ कॅन्सरचे संकेत, 'ही' चिन्हे असल्यास त्वरित डॉक्टरांना गाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:54 PM2021-10-22T16:54:24+5:302021-10-22T16:54:44+5:30

नखांवर दिसणारी ही चिन्ह काही गंभीर शारीरिक समस्या असल्याचे सांगतात, ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुमच्या नखांवर सुद्धा अशा खुणा असतील तर ती चिंतेची बाब आहे.

if you have marks in nails then it can be melanoma check yourself it can be cancer risk | तुमची नखं देतात 'या' विशिष्ट दुर्मिळ कॅन्सरचे संकेत, 'ही' चिन्हे असल्यास त्वरित डॉक्टरांना गाठा

तुमची नखं देतात 'या' विशिष्ट दुर्मिळ कॅन्सरचे संकेत, 'ही' चिन्हे असल्यास त्वरित डॉक्टरांना गाठा

googlenewsNext

जेव्हा तुमचे शरीर निरोगी असते, तेव्हा तुमच्या बोटांची नखेही निरोगी आणि गुळगुळीत दिसतात. परंतु, वृद्धत्व आणि शारीरिक समस्यांमुळे नखांचा रंग, टेक्स्चर आणि आरोग्य बदलू लागते. तुम्हाला माहित आहे का, की नखांवर दिसणारी ही चिन्ह काही गंभीर शारीरिक समस्या असल्याचे सांगतात, ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुमच्या नखांवर सुद्धा अशा खुणा असतील तर ती चिंतेची बाब आहे.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या नखांवरील खुणांचा अर्थ सांगणार आहोत आणि यामुळे तुम्हाला कोणकोणत्या आरोग्याचा धोका उद्घवू शकतो हे देखील सांगणार आहोत.

कॅन्सरचा धोका
सहसा त्वचेचा कर्करोग नेहमी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर होतो. हात, पाय किंवा पाठ आणि याची लक्षणे तुमचे तळहात, तळवे किंवा नखांवर देखील दिसून येते. ऑन्कोलॉजिस्टच्या मते, हे नखांच्या खाली किंवा भोवती गुठळ्या किंवा रंगद्रव्याच्या पट्ट्या म्हणून दिसते. कोणत्याही व्यक्तीचे लक्ष या गुणांकडे जात नाही, परंतु जर आपण आपल्या नखांवर काही समान खुण पाहात असाल तर आपण त्वरित त्वचेची म्हणजेच मेलेनोमाची चाचणी घ्यावी.

योग्य वेळी ओळखले जाणे आवश्यक
तज्ज्ञांनी सांगितले आहे की, जर मेलेनोमा योग्य वेळी सापडला आणि त्यावर उपचार केले तर त्यावर मात करणे सहज शक्य होते. हे कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. विशेषतः वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असतो.

UV रेडिएशन  हे मेलेनोमाचे कारण आहे
कॅन्सर रिसर्च यूके च्या मते, UV रेडिएशन  बहुतेक प्रकरणांमध्ये मेलेनोमाचे कारण असल्याचे आढळले आहे. कृत्रिम प्रकाश स्त्रोत जसे सनबँड, टॅनिंग सेटअप इत्यादी यासाठी जबाबदार असू शकतात. पण भारतामध्ये UV रेडिएशन  लोकांच्या त्वचेच्या संपर्कात येतात. ज्यामुळे त्यांना हा रोग होऊ शकतो. इंडियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, भारतीयांसाठी हे दुर्मिळ आहे आणि अशी प्रकरणे क्वचितच नोंदवली जातात.

मेलेनोमासाठी नखे तपासताना येथे चिन्हे आणि बदल तुम्ही लक्षात घ्यायला हवे. जर तुमच्या पायांच्या बोटांची नखे निघायला लागली, तर नखांचे दोन भाग पडू लगाले, नखेजवळ गडद पिवळ्या रंगाची त्वचा आणि नखां खाली गाठ येणे असे जर तुम्हाला काही काढले तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

Web Title: if you have marks in nails then it can be melanoma check yourself it can be cancer risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.