शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

जोडीदाराच्या विचारानेही कमी केला जाऊ शकतो तणाव - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 12:25 IST

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये वेगवेगळ्या कारणांनी लोकांमध्ये तणाव वाढतो आहे. याला कामाचं वाढतं ओझं आणि धावपळ प्रामुख्याने जबाबदार धरलं जातं.

(Image Credit : www.tlnt.com)

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये वेगवेगळ्या कारणांनी लोकांमध्ये तणाव वाढतो आहे. याला कामाचं वाढतं ओझं आणि धावपळ प्रामुख्याने जबाबदार धरलं जातं. हा तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या थेरपी, वेगवेगळे उपाय समोर येत असतात. यातच आणखी एकाची भर पडली आहे. एका रिसर्चनुसार, तणावात असताना तुमच्या जोडीदाराचा विचार करा, याने तुम्हाला आराम मिळेल. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, तुम्ही तणावात असताना जोडीदाराची आठवण काढाल तर तुमचं ब्लड प्रेशर वाढणार नाही. 

असा केला अभ्यास

अभ्यासकांनी स्ट्रेस म्हणजेच तणाव दूर करण्यासाठी १०० पेक्षा जास्त वॉलेंटीयर्सना त्यांचे पाय थंड पाण्यात ठेवण्यास सांगितले आणि जोडीदाराबाबत विचार करण्यास सांगण्यात आले. यावेळी अभ्यासकांना आढळलं की, टेंरररी हायपरटेंशन रोखण्यासाठी जोडीदारा विचार मदत करतो. अभ्यासकांना अशी आशा आहे की, कोणत्याही महत्त्वपूर्ण परीक्षेवेळी किंवा ऑपरेशनवेळी येणाऱ्या जास्त तणावात तुमच्या जोडीदाराबाबत विचार केल्याने फायदा होतो. हा रिसर्च यूनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनामध्ये करण्यात आला असून याचं नेतृत्व केल बोरासा याने केलं. 

बोरोसा म्हणाले की, आपलं जीवन हे तणावाने भरलेलं आणि हा तणाव केवळ नात्यांच्या माध्यमातूनच दूर केला जाऊ शकतो. एकतर जोडीदारासोबत थेट संवाद साधून किंवा त्या व्यक्तीचा मनात विचार करुन. कोणत्याही महत्त्वाच्या कामावेळी अशा तणावाचा अनेकदा सामना करावा लागतो. अशाप्रकारे आपण ब्लड प्रेशर कंट्रोल करून फायदा मिळवू शकतो. 

या रिसर्चमध्ये १०२ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. हे सगळे लोक कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते. या अभ्यासात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, हायपरटेंशनसोबत लढण्यासाठी जोडीदाराची काय भूमिका असू शकते. 

या अभ्यासात सहभागी सर्व लोकांना 3.3°C (38°F) ते 4.4°C (40°F) थंड पाण्यामध्ये एक मिनिटासाठी पाय ठेवण्यास सांगण्यात आले होते. थंड पाण्यामुळे नर्व्हमध्ये एक रिअॅक्शन होते. ज्यामुळे ब्लड वेसल्स आकुंचन पावतात आणि यामुळे हायपरटेंशन होतं. यावेळी या लोकांच्या जोडीदारांनाही त्यांच्यासमोर राहण्यास सांगण्यात आले होते. 

या रिसर्चमधून असं समोर आलं की, ज्या लोकांचे जोडीदार त्यांच्यासमोर होते किंवा ज्या लोकांना जोडीदारांबाबत विचार केला त्यांचं ब्लड प्रेशर दुसऱ्या सहभागी लोकांपेक्षा कमी होतं. यादरम्यान जे लोक रिलेशनशिपमध्ये आनंदी आणि संतुष्ट होते त्यांना सर्वात जास्त फायदा झालेला बघायला मिळाला. तसेच या रिसर्चमधून असेही समोर आले की, रिलेशनशिपमध्ये आनंदी राहणाऱ्यांचं आरोग्य सिंगल राहणाऱ्यांपेक्षा अधिक चांगलं का असतं. 

असाही करा तणाव दूर

एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. कॅनडामधील वाटरलू यूनिवर्सिटीच्या संशोधकांच्या एका टिमने सांगितले की, दररोज फक्त 10 मिनिटांसाठी ध्यान केल्याने सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच तणावाबाबत जागरूकता पसरवल्यानेही यापासून सुटका करण्यासाठी मदत मिळते. 

वाटरलू यूनिवर्सिटीचे संशोधक मेंग्रान शु यांनी सांगितले की, संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांमधून असं सिद्ध झालं की, ध्यान केल्यामुळे तणावामध्ये असलेल्या लोकांच्या विचारांमध्ये परिणाम घडून येतो. नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होते. तसेच एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणं शक्य होतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन