आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमीत ७ ते ८ तास झोप घेणं गरजेचं आहे. शरीराला चांगलं राहण्यासाठी झोपेची नितांत गरज असते. व्यवस्थित झोप झाली नाही तर दिवसभर काम करण्यासाठी उत्साह नसतो. तसंच काम करण्यासाठी मन लागत नाही. आपण कसे झोपतो आणि आजूबाजूचे वातावरण कसं आहे. यावर तुमची झोप अवलंबून असते.
अनेकदा झोपताना काही घरांमध्ये लाईट बंद न करताच झोपतात. त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नकारात्मक परीणामांचा सामना करावा लागतो. तर काहीजण मंद प्रकाशात झोपतात. तुम्हाला माहित आहे का या गोष्टींचा देखील तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया झोपताना प्रकाशात झोपणे योग्य आहे की नाही.
एका रिसर्चमधून असं दिसून आले की लाईट बंद करून झोपणे. हे शरीरासाठी स्वास्थासाठी योग्य असते. जर तुमची झोप योग्य प्रकारे पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर व मानसिक स्थितीवर होऊ शकतो. जेव्हा आपले शरीर थकलेले असते. त्याच वेळी मनाची एकाग्रता देखील कमी होऊ लागते. तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, झोप नीट पूर्ण होत नसेल, स्वभाव चिडचिडा झाला असेल तर या सर्व समस्या लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे होतात. रात्री झोपताना चेहऱ्यावर पडणारा प्रकाश हा मेंदूतील ग्रंथींना शांत होण्यास बाधा आणतो. त्यामुळे रात्री लाईट चालू ठेवणं आरोग्यासाठी अनुकूल नसतं.
रोज रात्री झोपताना मोबाईलच्या उजेडात तासनातास घालवल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. म्हणून शक्य असल्यास झोपण्याच्या आधी मोबाईलचा वापर टाळा. एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं की लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे वजन वाढते. हा रिसर्च महिलांवर करण्यात आला होता. त्यात असे दिसून आले की ज्या महिला टिव्ही किंवा लाईट चालू ठेवून झोपतात त्यांचे वजन अन्य महिलांच्या तुलनेत जास्त असते. याचे मुख्य कारण रात्री लाईट चालू ठेवून झोपणे आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी जास्त जेवणे हे देखील आहे.