शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात आजवर मी एकही सूर्योदय चुकवला नाही; ५५ वर्षांचा अक्की सांगतोय फिटनेसचे सिक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:29 IST

२४ तासातून १ तास स्वतःच्या फिटनेससाठी काढत नसाल तर आजारांना आमंत्रण देत आहात; सांगत आहे अक्षय कुमार

बी टाऊनवाले अर्थात बॉलिवूडचे कलाकार स्क्रीनवर कमी दिसले तरी पार्ट्यांमध्ये नक्की दिसतात. मात्र काही कलाकारांनी स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवले आहे. अक्षय कुमार अर्थात आपला लाडका अक्कीसुद्धा तुम्हाला क्वचितच पार्टीमध्ये दिसेल. तो सांगतो, 'पार्ट्या वाईट असतात असे मी म्हणणार नाही, पण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो हे नक्की! मला जागरणाची सवय नाही, मी रात्री ९.३० ला झोपतो, पहाटे ४ला उठतो. आजवर मी एकही दिवस सूर्योदय पाहणं चुकवले नाही.  दिवसाच्या सुरुवातीला योगाभ्यास, झुंबा, सायकलिंग, जिम असे विविध पर्याय निवडल्याने दिवसाची सुरुवात मस्त होते आणि पूर्ण दिवस आनंदात जातो.''

''माझ्या मते, दिवसभरातील २४ तासांपैकी १ तास तरी प्रत्येकाने व्यायाम केलाच पाहिजे. फिटनेसकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तो उपभोगायला चांगलं आरोग्यही पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आधी तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. मी स्वतः हा नियम कटाक्षाने पाळतो.''

म्हणूनच की काय, वयाच्या पंचावन्नाव्या वर्षीही अक्षय कुमार तरुण दिसतो. बॉलिवूडमधल्या नवनवीन नायिकांचा हिरो म्हणूनही शोभून दिसतो. तो व्यसनांपासूनही दूर राहतो, आहारात पथ्य पाणी सांभाळतो आणि विशेष म्हणजे रोजच्या व्यायामाला महत्त्व देतो.

या साध्या सोप्या गोष्टी आपल्यालाही फॉलो करता येण्यासारख्या आहेत. स्वतःवर घेतलेली मेहनत कायमच उपयोगी पडणारी आहे. यालाच सेल्फ इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. यासाठी उद्यापासून, सोमवारपासून, एक तारखेपासून व्यायाम सुरू करू असे म्हणत थांबू नका, कारण चांगल्या कामासाठी उद्या कधीच उगवत नसतो. शुभस्य शीघ्रम म्हणा आणि अक्षयचा आदर्श ठेवून तंदुरुस्त जीवन जगा.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यAkshay Kumarअक्षय कुमार