डाएटमधून अशाप्रकारे कमी करा मीठ, नाहीतर वाढेल High Blood Pressure चा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:16 IST2022-12-16T13:16:35+5:302022-12-16T13:16:48+5:30
How To Reduce Salt Content in Food: मिठामध्ये सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं. जर यावर कंट्रोल केलं गेलं नाही तर हाय ब्लड प्रेशरसारखी गंभीर समस्या होऊ शकते.

डाएटमधून अशाप्रकारे कमी करा मीठ, नाहीतर वाढेल High Blood Pressure चा धोका
How To Reduce Salt Content in Food: आपण सगळेच जेवणात आपल्या टेस्टनुसार मीठ टाकतो. जेणेकरून अन्न फिक्क लागू नये. जेवणात मीठ नसेल तर ते बेचव लागतं. पण याचं जास्त सेवन केलं गेलं तर अनेक समस्या होऊ शकतात. मिठामध्ये सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं. जर यावर कंट्रोल केलं गेलं नाही तर हाय ब्लड प्रेशरसारखी गंभीर समस्या होऊ शकते.
एका दिवसात किती मीठ खावं?
डब्ल्यूएचओ (WHO) म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (World Health Organization) नुसार, एका दिवसात 2 ग्रॅमपेक्षा कमी सोडिअम किंवा साधारण 5 ग्रॅम मीठ खावं. जर यापेक्षा जास्त मिठाचं सेवन केलं तर तुम्हाला हृदयासंबंधी आजार होऊ शकतात. जसे की, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर (Heart Failure), कोरोनरी आर्टरी डिजीज (Coronary Artery Disease) आणि ट्रिपल वेसल डिजीज (Triple Vessel Disease).
जर जास्त मीठ खाल्ल्याने इतके नुकसान होत असेल तर अर्थातच आपल्याला कोणत्याही स्थितीत मिठाचं सेवन कमी केलं पाहिजे. चला जाणून घेऊ असे फूड आयटम ज्यांनी सॉल्ट कंटेंट कमी केला जाऊ शकतो.
फ्रेश पदार्थ खावे
आजकालच्या धावपळीच्या जीवनात पॅकेटमधील पदार्थ खाण्याचं चलन जास्त वाढलं आहे. ज्यांमध्ये प्रिजर्वेटिवच्या रूपात मीठ मिक्स केलं जातं. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळे गरजेचं आहे की, तुम्ही फ्रेश फळ, भाज्या आणि चपाती खाव्या. याने तुम्ही मिठाचं प्रमाण स्वत: ठरवू शकाल.
फूड पॅकेटवरील इंग्रेडिएंट्स नक्की वाचा
जर तुम्हाला पॅकेटमधील फूड खायचं असेल तर पॅकेटवरील इंग्रेडिएंट्स नक्की वाचा. जाणून घ्या की, यात मिठाचं किती प्रमाण आहे. सामान्यपणे चिप्स, बिस्कीट आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. जे आरोग्यासाठी फार घातक असतं. याने तुम्ही हाय बीपीचे शिकार होऊ शकता.
फ्रिजमध्ये जास्त दिवस अन्न ठेवू नका
जर तुम्ही अन्न फ्रिजमध्ये जास्त दिवस स्टोर करून ठेवत असाल तर अन्नातील सोडिअमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे फ्रिजमध्ये अन्न एका दिवसापेक्षा जास्त ठेवू नका. याने आरोग्याला मोठं नुकसान होऊ शकतं.