शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Summer Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी राहील रेफ्रिजरेटरसारखं थंड, फॉलो करा 'या' सोप्या टीप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:20 IST

उन्हाळ्याचा कडाका वाढू लागला आहे आणि या वाढत्या तापमानासोबतच थंड पाणी पिण्याची ओढही वाढली आहे. थंड पाण्यासाठी अनेकजण रेफ्रिजरेटरचा वापर करतात, पण फ्रिजमधील पाणी घशासाठी हानिकारक ठरू शकते.

उन्हाळ्याचा कडाका वाढू लागला आहे आणि या वाढत्या तापमानासोबतच थंड पाणी पिण्याची ओढही वाढली आहे. थंड पाण्यासाठी अनेकजण रेफ्रिजरेटरचा वापर करतात, पण फ्रिजमधील पाणी घशासाठी हानिकारक ठरू शकते. दुसरीकडे, बॅचलर्स किंवा नैसर्गिक जीवनशैली आवडणारे लोक आजही मातीच्या माठालाच पसंती देतात. मात्र, अनेकदा 'माठातील पाणी फ्रिजसारखं थंड होत नाही' अशी तक्रार ऐकायला मिळते. जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल, तर खालील काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या माठाला नॅचरल फ्रिज बनवू शकता.

फॉलो करा 'या' सोप्या टीप्स!

१) ओल्या सुती कापडाचा वापर

माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी ही सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत आहे. एक जाड सुती कापड पाण्यात पूर्णपणे भिजवून ते माठाभोवती गुंडाळून ठेवा. जसे या कापडातील पाण्याचे बाष्पीभवन होईल, तशी माठातील उष्णता शोषली जाईल आणि पाणी गार होईल. लक्षात ठेवा, हे कापड कोरडे पडू देऊ नका, त्यावर अधूनमधून पाण्याचा शिडकावा करत राहा.

२) वाळूचा थर देईल थंडावा

एका मोठ्या परळीत किंवा रुंद भांड्यात वाळू भरा आणि ती पाण्याने चांगली ओली करा. आता तुमचा माठ या ओल्या वाळूवर ठेवा. वाळूतील ओलावा माठाच्या भिंतींना थंड ठेवतो, ज्यामुळे भर उन्हातही माठातील पाणी बर्फासारखे थंड लागते.

३) हवेचा संचार असलेली जागा निवडा

माठ कधीही बंद खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवू नका. तो अशा ठिकाणी ठेवा जिथे हवेची ये-जा (Ventilation) चांगली असेल, जसे की खिडकीजवळ. हवेच्या संपर्कात आल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि पाणी लवकर थंड होते.

४) जुना माठ बदलण्याची वेळ आलीय का?

जर तुमचा माठ खूप जुना झाला असेल, तर त्यावरील सूक्ष्म छिद्रे क्षार किंवा धुळीमुळे बंद होतात. अशा वेळी नवीन माठ खरेदी करणे उत्तम ठरेल. माठ घेताना तो नक्षीकाम केलेला किंवा पॉलिश केलेला नसावा, कारण अशा माठात हवेचा संचार नीट होत नाही. तसेच, माठ बाहेरून धुताना कधीही साबण वापरू नका, फक्त साध्या पाण्याने आणि ब्रशने स्वच्छ करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Matka Water Fridge-Cold This Summer: Simple Cooling Tips

Web Summary : Beat the heat! Keep matka water refreshingly cool with simple tips: wet cloth, sand bed, ventilation, and replacing old pots. Enjoy natural cooling!
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स