जिममध्ये एक्सरसाइज करताना कसे कपडे वापरावेत, तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 11:56 IST2020-02-21T11:45:31+5:302020-02-21T11:56:50+5:30
जिमला जाण्यासाठी शारीरिक क्षमता आणि स्फूर्ती जेवढी महत्वाची आहे तेवढीच कपड्याची निवड महत्वाची आहे. तुम्हीही अंगावर काहीही घालून एक्सरसाइज करू शकत नाही.

जिममध्ये एक्सरसाइज करताना कसे कपडे वापरावेत, तुम्हाला माहीत आहे का?
(Image Credit : popsugar.com)
चांगली बॉडी मिळवण्याचं स्वप्न सगळेच बघतात. पण हे स्वप्न काहीच लोक पूर्ण करू शकतात. बॉडीसाठी लोक जिममध्ये मेहनत करतात. पण वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करण्यासोबतच जिममध्ये जाताना कपड्यांची योग्य निवड करणंही तेवढंच महत्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला जिमला जाताना कशाप्रकारच्या कपड्यांची निवड करावी हे सांगणार आहोत.
कपड्यांची योग्य निवड महत्वाची का?
जिमला जाण्यासाठी शारीरिक क्षमता आणि स्फूर्ती जेवढी महत्वाची आहे तेवढीच कपड्याची निवड महत्वाची आहे. तुम्हीही अंगावर काहीही घालून एक्सरसाइज करू शकत नाही. अनेकांना असाही प्रश्न पडत असेल की, एक्सरसाइज दरम्यान विशेष कपड्यांना इतकं का महत्व असतं. तज्ज्ञ यावर सांगतात की, एक्सरसाइजचा प्रभाव शरीरावर व्यापक रूपाने पडावा यासाठी ते महत्वाचं आहे.
मसल्स, ट्रेम्प्रेचर आणि शेपवर पडतो प्रभाव
जर तुमचे कपडे एक्सरसाइज करण्यासाठी योग्य नसतील तर जिमचा प्रभाव तुमच्या शरीरावर दिसून येणार नाही. एक्सरसाइज दरम्यान आपलं शरीर फार गरम होतं आणि घामही जास्त येतो. त्यामुळेही कपडे योग्य असणं गरजेचं ठरतं. काही लोक कपड्यांची फार काळजी न करता आहे ते कपडे घालून तसेच जिमला जातात. पण याचा शरीरावर उलटा प्रभाव होतो. कपड्याच्या फॅब्रिकची विशेष काळजी घ्यावी लागते जेणेकरून ट्रेनिंग दरम्यान मसल्स आणि शेप प्रभावित होऊ नये.
महिलांसाठी कसे असावेत कपडे?
महिलांसाठी अलिकडे बाजारात जिमचे कितीतरी कपडे उपलब्ध आहेत. महिलांनी जिमला जाण्यापूर्वी योग्य फिटिंगच्या स्पोर्ट्स ब्रा ची निवड केली पाहिजे. जर योग्य फिटिंगची ब्रा नसेल तर एक्सरसाइज करताना अडचण होऊ शकते. तसेच जिमच्या कपड्यांनी निवड करताना हे ध्यानात घ्या की, कपडे जास्त लूज असून नये किंवा जास्त टाइट असू नये. योग्य साइज असेल तरच घाम सहजपणे अब्सॉर्ब होऊ शकतो.
एक्सरसाइजनुसार निवडा कपडे
रनिंग आणि ट्रेडमिलसाठी टाइट कपडे योग्य मानले जातात. महिलांसाठी सपोर्टिग स्पोर्ट्स ब्रासोबतच टाइट टी-शर्ट आणि टाइट लेगिंगला जिम जाण्यासाठी सर्वात चांगलं मानलं जातं. जर तुम्ही योगाभ्यास करत असाल तर त्या स्थितीत बॉटम वेअर म्हणून तुम्ही लूज पायजाम्याची निवड करू शकता.
पुरूषांसाठी कसे असावेत कपडे?
जिमला जाण्यासाठी कपडे पुरूषांसाठीही महत्वाचे आहेत. काही लोक जिमला जाताना शॉर्ट्स घालणे जास्त पसंत करतात. पण तज्ज्ञ सांगतात की, कपडे पूर्ण शरीराभर असतील तर जास्त चांगलं असतं. कारण एक्सरसाइज करताना पायांनाही घाम येतो. त्यामुळे फुल लेंथ ट्राउजरची निवड योग्य ठरेल. याने घाम पूर्णपणे शोषला जाईल आणि तुम्ही योग्यप्रकारे एक्सरसाइज करू शकाल. जर तुम्ही हेवी वेट एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही सपोर्टरचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच लूज टी-शर्टचा वापर करणं जास्त फायदेशीर राहतं.
कापड कसा असावा?
कपडे कसे असावेत याबाबत तुम्हाला आता माहिती मिळाली आहे. पण आता कपड्यांचं फॅब्रिक कसं असावं हेही जाणून घेणं महत्वाचं आहे. जिमचे कपडे कॉटन आणि लेनिनचे असतील तरच चांगले मानले जातात. हे फॅब्रिक घाम शोषून घेण्यासाठी सर्वात चांगलं मानलं जातं. पण कपडा पूर्णपणे कॉटनचा असू नये. कारण हा कापडा सुकायला जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे कॉटन, लेनिन किंवा लयक्रा मिक्स कापडाची निवड करू शकता.