डिप्रेशन दूर करण्यासाठी खास उपाय, आरोग्यालाही होतील फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 10:51 AM2019-11-08T10:51:33+5:302019-11-08T10:51:52+5:30

आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक हे मान्य करतात की, बॉडी फिटनेससाठी एक्सरसाइज केली जाते.

How regular exercise reduces risk of depression | डिप्रेशन दूर करण्यासाठी खास उपाय, आरोग्यालाही होतील फायदे

डिप्रेशन दूर करण्यासाठी खास उपाय, आरोग्यालाही होतील फायदे

Next

(Image Credit : health.harvard.edu)

आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक हे मान्य करतात की, बॉडी फिटनेससाठी एक्सरसाइज केली जाते. सोबतच रोज एक्सरसाइज करून आपण फिट आणि निरोगी बॉडी मिळवू शकतो. मात्र, एक्सरसाइजचे आणखीही काही फायदे आहेत. जसे की, रोज एक्सरसाइज केल्याने आपण डिप्रेशनसारख्या गंभीर आजारापासून दूर राहतो. डिप्रेशन हा एक मानसिक आणि भावनात्मक आरोग्याशी संबंधित आजार आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, आठवड्यातून कमीत कमी  ४ तास एक्सरसाइज करूनही लोक दोन वर्षांपर्यंत डिप्रेशन किंवा स्ट्रेससारख्या आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकतात. याचा फायदा ज्यांना डिप्रेशनची समस्या जेनेटिक आहे त्यांनाही मिळतो. म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये डिप्रेशनची जेनेटिक लक्षणे असतील तर हे लोक नियमितपणे एक्सरसाइज करूनही स्वत:ला डिप्रेशनपासून वाचवू शकतात. 

या रिसर्चच्या मुख्य आणि मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील पोस्टडॉक्टरल फेलो कर्मेल चोई यांनी सांगितले की, 'आमच्या रिसर्चच्या निष्कर्षातून ही बाब पूर्णपणे समोर आली आहे की, जेव्हा डिप्रेशनचा विषय येतो तेव्हा हे लोक नियमितपणे एक्सरसाइज करून डिप्रेशनला स्वत:पासून दूर ठेवू शकतात'.

दरम्यान याआधी अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की, स्ट्रेसमुळे तुम्हाला डिप्रेशनची समस्या होऊ शकते. त्यामुळे स्ट्रेस फ्री जगायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने करा. सकाळी लवकर उठा. मोकळ्या वातावरणात जाऊन मूड फ्रेश करा. आरोग्यासाठी व्यायाम आणि नाश्ता महत्त्वाचा असल्याने तो वेळेत करा. सकाळी उठल्या उठल्या कामाचा ताण घेऊ नका. चांगली गाणी ऐका यामुळे शरिरात उत्साह येईल. 


Web Title: How regular exercise reduces risk of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.