पोटाचा घेर कमी करण्यासाठी डाएट नाही, तर 'या' बीया ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 11:21 AM2020-01-17T11:21:30+5:302020-01-17T11:27:50+5:30

सध्याच्या जमान्यात प्रत्येक मुलीला स्लिमट्रिम राहायचं असतं त्यासाठी मुली वेगवेगळे प्रयोग करत असतात.  

How to reduce belly fat by using various seed's | पोटाचा घेर कमी करण्यासाठी डाएट नाही, तर 'या' बीया ठरतील फायदेशीर

पोटाचा घेर कमी करण्यासाठी डाएट नाही, तर 'या' बीया ठरतील फायदेशीर

googlenewsNext

सध्याच्या जमान्यात पत्येक मुलीला स्लिमट्रिम राहायचं असतं त्यासाठी मुली वेगवेगळे प्रयोग करत असतात.  कारण बांधा बारीक असलेल्या मुली जाड शरिरयष्टी असलेल्या महिलांच्या तुलनेत सुंदर दिसत असतात. तसंच  बारीक असलेल्या मुलींच वय दिसून येत नाही. याऊलट ज्या महिला लठ्ठ असतात. त्या स्वतःच्या वयापेक्षा जास्त मोठ्या दिसत असतात. तुम्हाला सुध्दा वजन वाढण्याची  किंवा शरीर बेढब होण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही कारणं नाही. 

साधारणपणे ज्या महिला जाड असतात. त्या जास्त आहार घेतात म्हणून जाडं दिसतात. असं अजिबात नाही.  त्यांच्या कमरेचा आणि पोटाचा तसंच मांड्यांचा भाग  हार्मोनल बदलांमुळे  वाढत जात असतो. त्यामुळे बेढब शरीर दिसायला लागतं.  तुम्हाला सुद्धा या समस्येचा सामना करावा लागत असेल तर टेंन्शन घेण्याचे काही कारण नाही. काही घरगुती वापरात असलेल्या बीयांचा वापर करून तुम्ही आपल्या पोटाचा घेर कमी करू शकता. आपण फळांच्या किंवा कोणत्याही सहज स्वयंपाक घराच्या किचनमध्ये असलेल्या बीयांचा आहार घेऊन वजन कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया बीयांच्या साहाय्याने कसं वजन कमी होईल.


आळशीच्या बीया

Image result for alshi chya biya

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आळशीच्या बीया फायदेशीर ठरतं असतात. आळशीच्या बीयांमध्ये डाएटरी फायबरर्स असतात. ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. जर तुम्हाला गरोदरपणा नंतर वाढलेलं पोट कमी करायचं असेल  तर तुम्ही आळशीच्या बियांचा समावेश आहारात करा. त्यासोबतच आळशीच्या बीया आरोग्यासाठी चांगल्या असतात. स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आळशीच्या बीया फायदेशीर ठरतात. ( हे पण वाचा-वजन वाढू नये असं वाटत असेल तर रोज किती भात आणि चपात्या खायच्या?)

भोपळ्याच्या बीया

Image result for pumpkin seeds

भोपळ्याच्या बीयांचा  आहारात समावेश केल्यास शरीरासाठी लाभदायक ठरतं असतं त्यासाठी आहारात भोपळ्याचा समावेश करा.  या बीयांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.  मेटाबॉलीझम फास्ट करण्यासोबतच भोपळ्यच्य बीया वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात.( हे पण वाचा-ऑपरेशन करून नाही तर घरच्याघरी 'या' उपायांनी किडनी स्टोनपासून मिळवा सुटका)

तिळ

Image result for til

वजन कमी करण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते. यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. त्यामुळे तुमचे कॉलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. तिळाच्या सेवनाने पोटाच्या समस्या सुद्दा दूर होतात.  पोट साफ न होण्याची समस्या असेल तर तिळाचे सेवन गुणकारक ठरते.

तुळशीच्या बीया

Image result for tulsee seed

वजन कमी करण्यासाठी  तुम्ही तुळशीच्या बीयांचे सेवन करायला हवं. तुळशीच्या बीयांमुळे पाचनक्रिया व्यवस्थित राहते. तुळशीच्या बीयांमध्ये  एंटी ऑक्सिडेंट्स  असतात. शरिरातील रोगप्रतिकारकशक्ती  वाढण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Web Title: How to reduce belly fat by using various seed's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.